
-
ऋजुता लुकतुके
ऐन पावसाळ्यात बंगळुरूमध्ये मंगळवारपासून दिवाळी साजरी होत आहे. मंगळवारी मध्यरात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) त्यांची फ्रँचाईजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएलचा चषक उंचावला आणि बंगळुरूसह हैद्राबादमध्येही लोकांचा जल्लोष सुरू झाला. १८ वर्षांतील आपली चौथी अंतिम फेरी खेळणारा संघ अखेर चषकावर नाव कोरण्यात यावेळी यशस्वी झाला. या हंगामात बंगळुरूने लीगमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आणि प्रतिस्पर्धी संघांना त्यांच्या गुहेत जाऊन तब्बल आठ विजय मिळवले आहेत. अंतिम सामनाही तसाच जोशपूर्ण होता. आणि फलंदाजी तसंच गोलंदाजीतही सरस कामगिरी करत बंगळुरूने हा विजय साकारला. (IPL 2025, RCB Champions)
फ्रँचाईजीचे चाहते बंगळुरूत बीएसजी मैदानावर हजारोंच्या संख्येनं जमले होते. तिथे मोठ्या पडद्यावर सामन्याचा आनंद लुटत होते. संघाने सामना जिंकल्यावर कलबुर्गी (Kalaburagi) उपनगरात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. लोक आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यांवर उतरले. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) जमलेल्या लोकांचाही मूड वेगळा होता. तिथे सगळ्यांचं लक्ष भावूक झालेल्या विराट कोहलीकडे (Virat Kohli) होतं. हेझलवूडने (Josh Hazlewood) विसाव्या षटकातील पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले, तिथेच बंगळुरूचा विजय स्पष्ट झाला. आणि विराटने काही सेकंद जमिनीवर बैठक मारली. त्यानंतर हेझलवूडचं षटक पूर्ण झालं. आणि विराट आपल्या भावना आवरु शकला नाही. जमिनीवर गवतात डोकं खुपसून त्याने भावनांना वाट मोकळी करून दिली. (IPL 2025, RCB Champions)
(हेही वाचा – IPL 2025, RCB Champions : किंग कोहलीची आणखी एका आयपीएल विक्रमाला गवसणी)
📍From HSR Layout, Bengaluru
To all the haters hating on #RCB winning the trophy, just look at the sheer amount of happiness of these fans. More than a cricket match, a long awaited dream came true❣️ #ನಮ್ಮRCB
Thankyou god that I could experience these happy faces celebrating! pic.twitter.com/7eKzInLCZq
— whynesspower ⟠ (@whynesspower) June 3, 2025
Bengaluru vibing with pure joy right now 😎🔥 pic.twitter.com/gTxlKhrZhM
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) June 3, 2025
(हेही वाचा – Corona Update: महाराष्ट्रात मंगळवारी ५९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद ! ४९४ सक्रिय रुग्ण)
BENGALURU WENT CRAZY. 🤯pic.twitter.com/MqqNi6ztRn
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 4, 2025
This is not Bengaluru. This is Hyderabad 🤩
Have you seen any other teams getting this much love? #EeSalaCupNamde #Rcbvspbks pic.twitter.com/nIlStRneuE
— 👑Che_Krishna🇮🇳💛❤️ (@CheKrishnaCk_) June 3, 2025
हेही पहा –
Join Our WhatsApp Community