IPL 2025 : सर रविंद्र जडेजाचा विषयच हार्ड, यंदाच्या मोसमातला बिग सिक्सर…

IPL 2025 हंगामातील ५२वा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुध्द चेन्नई सुपर किंग्ज याच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईचा २ धावांनी पराभव झाला.

43

IPL 2025 हंगामातील ५२वा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुध्द चेन्नई सुपर किंग्ज याच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईचा २ धावांनी पराभव झाला. अटीतटीच्या सामन्यात चेन्नईने २१४ धावांचा पाठलाग करताना रविंद्र जडेला फंलदाजी करत एकाकी झुंज देत सामना खेचून आणण्याकरिता जोरदार प्रयत्न केले. परंतु, जडेजाला संघासाठी सामना जिंकवून देण्यात यश आले नाही. कालच्या सामन्यात रविंद्र जडेजाने ८ चौकार २ षटकारांसह ४५ चेंडूत ७७ धावा केल्या.

(हेही वाचा Ladki Bahin Yojana साठी सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागांचा 745 कोटींचा निधी वर्ग )

दरम्यान, रविंद्र जडेजाने IPL 2025 मोसमात लगावलेला सर्वात लांब षटकार चाहत्यांना चांगलाच लक्षात राहिला. आरसीबीविरुध्दच्या सामन्यात १७व्या षटकात आरबीसीचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर रविंद्र जडेजाने १०९ मीटर लांब षटकार लगावला. १७व्या षटकातील ५व्या चेंडूवर जडेजाने लगावलेल्या षटकाराची क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा पाहायला मिळाली. कारण, जडेजाने मारलेला षटकार थेट स्टेडियमच्या छतावर लँड झाला.

चेन्नईविरुध्दच्या सामन्यात बँगलोरने विजय मिळवित गुणतालिकेत अव्वल स्थान पटकाविले आहे. आरसीबी संघाने आतापर्यंत ११ सामने खेळले असून ०३ सामने गमावले असून ०८ सामन्यात विजय प्राप्त केला असून १६ गुणांची कमाई केली आहे. सद्यस्थितीस IPL 2025 आरसीबी अव्वलस्थानावर असून गुणतालिकेत १६ गुणांसह क्वालिफाईकरिता आगेकूच करताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत, आरसीबी संघ प्लेऑफमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे चेन्नईने ११ सामन्यात फक्त २ विजय मिळविले असून गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानावर आहे.

थोडक्यात, आरबीसीने प्रथम फलंदाजी करत विराट कोहली, जैकब बेथेल आणि रोमारियो शेफर्ड यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २१३ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने २११ धावांपर्यंत मजल मारली. यात नवोदित खेळाडू आयुष म्हात्रे(९४ धावा) आणि रविंद्र जडेजा(७७ धावा) यांच्यात ११४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. या भागीदारीच्या जोरदार चेन्नईला २१४ धावांचा पाठलाग करता आला. परंतु, सरतेशेवटी केवळ ०२ धावांना पराभव स्वीकारावा लागला. IPL 2025

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.