-
ऋजुता लुकतुके
पंजाब किंग्जचा संघ यंदा आयपीएल जिंकू शकणार नाही असं म्हणतानाच माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीने संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगवरही एक मोठा आरोप केला आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्घच्या सामन्याचं उदाहरण देताना मनोज तिवारीने परदेशी खेळाडूंना मिळणारा अग्रक्रम अधोरेखित केला आहे. ‘प्रभसिमरन आणि प्रियांश आर्य यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिलेली असताना, पाँटिंगने चौथ्या क्रमांकावर ग्लेन मॅक्सवेल आणि पाचव्या क्रमांकावर मार्को यानसेनला पाठवलं. त्यामुळे शशांक सिंग आणि नेहल वढेरा यांना फलंदाजीची पुरेशी संधी मिळाली नाही. परदेशी फलंदाजांना भारतीय फलंदाजांपेक्षा अग्रक्रम मिळत आहे. आणि हीच रणनीती कायम राहिली, तर पंजाबला विजेतेपद पटकावता येणार नाही,’ असं मनोज तिवारी म्हणाला. (IPL 2025, Punjab Kings)
मनोज तिवारीने तसं ट्विटच केलं आहे. ‘मला असं आतून वाटतंय की, सध्या पंजाबचा संघ पहिल्या दोनांत आला तरी तो विजेतेपद पटकावू शकणार नाही. पाँटिंग भारतीय फलंदाजांवर विश्वास दाखवत नाहीए. आणि हे असंच सुरू राहिलं तर विजेतेपद त्यांच्यापासून दूर जाईल,’ असं मनोज तिवारी म्हणतो. (IPL 2025, Punjab Kings)
(हेही वाचा – Pahalgam Attack Update: पहेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रेल्वेच्या सुरक्षेत वाढ)
My gut feeling says that punjab team will not be able to win the #IPL trophy this season because what I saw today when they were batting was, the coach didn’t send Indian inform batters Nehal wadera and Shasank singh, instead he trusted his foreign players to deliver, but they…
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) April 26, 2025
कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज दरम्यानचा सामना पावसात वाहून गेला. पंजाबने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतल्यावर सलामीवीरांनी केलेल्या शतकी सलामीमुळे त्यांनी निर्धारित २० षटकांत पंजाब किंग्ज संघाने ४ बाद २०१ धावा केल्या. आणि त्यानंतर कोलकाता संघाने एका षटकांत ७ धावा केल्या असताना मुसळधार पाऊस सुरू झाला. ९.३५ वाजता सुरू झालेला पाऊस थांबण्याचं नाव घेईना. आणि ग्राऊंड्समननी मैदानावर कव्हर्स घालती तरी वाऱ्यामुळे ती वारंवार उडून जात होती. (IPL 2025, Punjab Kings)
अखेर परिस्थितीचा आढावा घेऊन रात्री अकरा वाजता सामना संपल्याचं जाहीर करण्यात आलं. या हंगामातील अनिर्णित राहिलेला हा पहिलाच सामना आहे. दोन्ही संघांनाी एकेक गुण देण्यात आला. कोलकाता संघाकडे आता ९ सामन्यांतून ७ गुण आहेत. आणि ते गुण तालिकेत सातव्या क्रमांकावर आहेत. तर पंजाब किंग्जचा संघ ९ सामन्यांत ११ गुण मिळवून पाचव्या क्रमांकावर आहे. (IPL 2025, Punjab Kings)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community