IPL 2025 Point Table : पंजाब पहिल्या दोन संघांत तर मुंबई चौथी, बंगळुरूला पहिल्या दोनांत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल?

मंगळवारी स्पर्धेचा शेवटचा साखळी सामना आहे.

80
IPL 2025 Point Table : पंजाब पहिल्या दोन संघांत तर मुंबई चौथी, बंगळुरूला पहिल्या दोनांत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल?
IPL 2025 Point Table : पंजाब पहिल्या दोन संघांत तर मुंबई चौथी, बंगळुरूला पहिल्या दोनांत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल?
  • ऋजुता लुकतुके

यंदा आयपीएलमध्ये बाद फेरीचे चार संघ साखळी स्पर्धा संपण्याआधीच ठरले. पण, या चार संघांतील क्रमवारी मात्र अगदी शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत ठरलेली नसेल. गुणतालिकेतील अव्वल दोन संघांना महत्त्व आहे. कारण, या संघांना बाद फेरीतही दोनदा संधी मिळते. पहिले दोन संघ पहिल्या पात्रता फेरीत आमने सामने येतात. यातील विजेता थेट अंतिम फेरीत जातो. तर पराभूत संघ एलिमिनेटर सामना जिंकलेल्या संघाशी दुसरा पात्रता सामना खेळतो. आणि या सामन्याती विजेता संघ मग अंतिम फेरीत स्थान पटकावतो. म्हणजेच एकदा पहिल्या दोनांत स्थान मिळवलं की, पहिला पात्रता सामना हरल्यावरही दुसरी संधी मिळते.

पंजाब किंग्जने (Punjab Kings) सोमवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) दमदार विजय मिळवून १९ गुणांसह सध्या अव्वल क्रमांक पटकावला आहे. आणि त्यांचं अव्वल दोन संघांतील स्थान पक्कं आहे. पण, त्यांच्याबरोबरचा दुसरा संघ कुठला असणार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) की गुजरात टायटन्स(GT), हे मंगळवारच्या शेवटच्या साखळी सामन्यानंतरच ठरणार आहे. हा सामना बंगळुरूने जिंकला तर त्यांचेही १४ सामन्यांतून १९ गुण होतील. आणि मग सरस धावगतीच्या आधारे पंजाब आणि बंगळुरू यांच्यातील अव्वल संध ठरेल. (IPL 2025 Point Table)

(हेही वाचा – US President Donald Trump : रशिया-युक्रेन युध्द संपविल्याची भाषा करणारे आता राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर बरसले; म्हणाले…)

पहिल्या पात्रता फेरीत हेच दोन संघ आमने सामने येतील. पण, बंगळुरू संघाचा मंगळवारी पराभव झाला तर १७ गुणांसह ते तिसऱ्या क्रमांकावरच राहतील. आणि त्यांना एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) खेळावं लागेल. थोडक्यात, शेवटच्या सामन्यात बंगळुरू संघासाठी विजय आवश्यक आहे. आणि तो किती फरकाने मिळतो, यावर त्यांचं गुणतालिकेतील स्थान ठरणार आहे. (IPL 2025 Point Table)

गुण तालिकेचं हे गणित समजून घेऊया,

पंजाब किंग्जचे (Punjab Kings) सध्या १४ सामन्यांतून १९ गुण झाले आहेत. आणि त्यांची धावगती आहे ०.३७२ इतकी. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे १३ सामन्यांतून १७ गुण झाले आहेत. आणि त्यांची धावगती ०.२५५ इतकी आहे. म्हणजेच लखनौ विरुद्धचा शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकला तर त्यांना गुणतालिकेत अव्वल होण्याची संधी आहे. बंगळुरूला शेवटचा सामना जिंकण्याबरोबरच धावगतीही ०.११७ नी वाढवण्याची गरज आहे. तसं झालं तर ते गुण तालिकेत अव्वल स्थानावर पोहोचतील. पहिली डाव संपल्यानंतर त्यांना धावगती वाढवण्यासाठीच्या धावांचा अंदाज येईल. (IPL 2025 Point Table)

स्पर्धेतील पहिला पात्रता सामना आणि एलिमिनेटरचा सामना मुल्लनपूर इथं होणार आहेत. तर दुसरा पात्रता सामना आणि अंतिम सामना गुजरातच्या अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) रंगणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.