IPL 2025, Play-off Scenario : हैद्राबादविरुद्धच्या पराभवानंतरही लखनौला बाद फेरीची आशा आहे का?

लखनौचं २०५ धावांचं आव्हान हैद्राबादने ६ गडी राखून पार केलं.

54
IPL 2025, Play-off Scenario : हैद्राबादविरुद्धच्या पराभवानंतरही लखनौला बाद फेरीची आशा आहे का?
IPL 2025, Play-off Scenario : हैद्राबादविरुद्धच्या पराभवानंतरही लखनौला बाद फेरीची आशा आहे का?
  • ऋजुता लुकतुके

अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) २० चेंडूंत ५९ धावा करत सनरायझर्स हैद्राबादला (Sunrisers Hyderabad) दणदणीत सुरुवात करून दिली. त्या जोरावर त्यांनी सामनाही ६ गडी राखून आरामात जिंकला. लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) १२ सामन्यातील हा सातवा पराभव होता. आणि त्यामुळे बाद फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशांनाही सुरुंग लागला आहे. अभिषेकने आठव्याच षटकात संघाचं शतक फलकावर लावलं. तिथून पुढे क्लासेन तसंच ईशान किशनने (Ishan Kishan) संघाला विजयाच्या मार्गावर नेलं.  (IPL 2025, Play-off Scenario)

या पराभवामुळे लखनौ सुपर जायंट्‌स संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. सध्या १२ सामन्यांत त्यांचे १० गुण आहेत. आणि उर्वरित दोन सामने जिंकले तरी त्यांचे १४ गुण होतील. आणि इतर संघांमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) १४ गुणांसह चौथ्या तर दिल्ली १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत. या दोन्ही संघांपैकी जो संघ सलग दोन सामने जिंकेल, त्यांना बाद फेरीचं तिकीट मिळेल. विशेष म्हणजे दिल्ली आणि मुंबई हे संघ बुधवारी मुंबईत वानखेडे मैदानावर आमने सामने येत आहेत. या सामन्यातील विजेत्याला बाद फेरी गाठण्याची चांगली संधी आहे. (IPL 2025, Play-off Scenario)

(हेही वाचा – काशी, मथुराच नव्हे, तर प्रत्येक मंदिर मुक्तीसाठी हिंदूंचा सहभाग अत्यावश्यक; अधिवक्ता Vishnu Shankar Jain यांचे प्रतिपादन)

दुसरीकडे, आयपीएल (IPL 2025) पुन्हा सुरू झाली तेव्हा लखनौला बाद फेरीसाठी त्यांचे राहिलेले सर्वच्या सर्व म्हणजे ३ सामने जिंकण्याची गरज होती. पण, पहिल्याच पराभवानंतर त्यांचं आव्हान संपलं आहे. ‘खरंतर आमचा संघ पाहता, हा हंगाम आमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकला असता. पण, सगळं वेगळं घडत गेलं. आणि दुखापती, फॉर्म तसंच खेळाडूंची उपलब्धता यांचा फटका आम्हाला बसला. आणि अखेर संधी असूनही आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही,’ असं लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) बोलून दाखवलं. खुद्द ऋषभ पंत या हंगामात चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याचाही फटका संघाला बसला. (IPL 2025, Play-off Scenario)

आता आयपीएलमध्ये (IPL 2025) बाद फेरीचं चित्र जवळ जवळ निश्चित झालं आहे. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी बाद फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. तर चौथ्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या संघांमध्ये आता चुरस आहे.

हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.