-
ऋजुता लुकतुके
गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा १० गडी राखून पराभव केल्यावर गुजरात बरोबरच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जचं कामही सोपं झालं आहे. आता पहिल्या तीन जागा निश्चित झाल्यानंतर चुरस आहे ती चौथ्या स्थानासाठी. चेन्नई, हैद्राबाद, राजस्थान आणि कोलकाता संघाचं आव्हानही संपुष्टात आलं आहे. चौथ्या जागेसाठी मात्र मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या तीन तुल्यबळ संघांमध्ये तगडी लढत आहे. साखळीचे १३ सामने आता बाकी आहेत. यात तीनपैकी कुठल्या संघाला किती विजय मिळवावे लागतील ते पाहूया. गुजरात, पंजाब आणि बंगळुरू या तीनही बाद फेरी गाठलेल्या संघांचे प्रत्येकी दोन सामने अजून बाकी आहेत. त्याचबरोबर मुंबई, लखनौ आणि दिल्लीचेही प्रत्येकी दोन सामने बाकी आहेत. (IPL 2025, Play-off Race)
(हेही वाचा – Maharashtra Government : चालू आर्थिक वर्षाकरिता ४४ लाख ७६ हजार कोटींच्या पतपुरवठा आराखड्यास मान्यता)
गुणतालिकेत सध्या मुंबईचा संघ १२ सामन्यांतून ७ विजय मिळवून १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ १२ सामन्यांतून ६ विजय मिळवून १३ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. यात दिल्लीचा एक सामना पावसामुळे वाहून गेल्यामुळे त्यांना एक गुण मिळाला होता. तर लखनौ सुपर जायंट्सचा संघ १० गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. पण, त्यांनी अजून ११च सामने खेळले आहेत आणि त्यांचे तीन सामने अजून बाकी आहेत. त्यामुळे आणखी ६ गुण मिळवून १६ गुणांवर पोहोचण्याची संधी त्यांना आहे. मात्र लखनौसमोर उर्वरित सामन्यांमध्ये आव्हान आहे ते गुजरात टायटन्स आणि बंगळुरू चॅलेंजर्सचं. त्यांचा सनरायझर्स हैद्राबाद विरुद्धचा सामना सोडला तर इतर दोन सामने त्यांच्यासाठी कठीण असणार आहेत. (IPL 2025, Play-off Race)
(हेही वाचा – चुकीच्या पद्धतीने सशुल्क वाहनतळाच्या कंत्राटाला मुदतवाढ; Adv. Makarand Narvekar यांनी केली ‘ही’ मागणी)
तर मुंबईचे दोन सामने दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज विरुद्ध आहेत. हे सामनेही त्यांच्यासाठी तसे सोपे जाणार नाहीत. येत्या बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणारा सामना हा त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असेल. दिल्लीसाठीही हा सामना निर्णायक असेल. दिल्लीचा एक सामना मुंबई विरुद्ध तर शेवटचा साखळी सामना पंजाब किंग्जविरुद्ध असेल. बाद फेरी गाठण्यासाठी हे दोन्ही जिंकणं त्यांच्यासाठी आवश्यक असेल. थोडक्यात म्हणजे उर्वरित ७ दिवसांमध्ये गुणतालिकेतील चौथ्या क्रमांकासाठीची टक्कर जास्तीत जास्त आक्रमक होत जाणार आहे. (IPL 2025, Play-off Race)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community