IPL 2025, PBKS vs RCB : विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणारा फलंदाज

विराट कोहलीने पंजाबविरुद्ध ५४ चेंडूंत नाबाद ७३ धावा केल्या.

51
IPL 2025, PBKS vs RCB : विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणारा फलंदाज
IPL 2025, PBKS vs RCB : विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणारा फलंदाज
  • ऋजुता लुकतुके

 विराट कोहली (Virat Kohli) आयपीएलमध्ये (IPL 2025) मैदानात उतरतो, तेव्हा कुठला ना कुठला विक्रम घडतोच, अशा कारकीर्दीच्या वळणावर तो आहे. तो टिकून रहिला तर विक्रमाची निश्चिती असते. पंजाब किंग्ज संघाविरुद्ध विराटने ५४ चेंडूंत नाबाद ७३ धावा करत आपल्या संघाला विजयी केलं. त्या प्रयत्नांत आयपीएलच्या (IPL 2025) इतिहासात ५० किंवा त्याहून अधिक धावा सर्वाधिक वेळा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. हे आयपीएलमधील त्याचं ५९ वं शतक होतं. आणि एकूण ६७ वेळा त्याने पन्नाशी किंवा त्याहून जास्त धावा केल्या आहेत. यापूर्वी डेव्हिड वॉर्नरने (David Warner) ६६ वेळा अशी कामगिरी केली होती. त्याला आता विराटने (Virat Kohli) मागे टाकलं आहे. (IPL 2025, PBKS vs RCB)

विराटच्या खात्यात ५९ अर्धशतकं आणि  शतकं आहेत. तर डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नावावर ६२ अर्धशतकं आणि ४ शतकं आहेत. ५० पेक्षा जास्त धावा सर्वाधिक वेळा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीवर एक नजर टाकूया,

(हेही वाचा – JD Vance : अमेरिकेचे उपराष्ट्रपती चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर ; ‘या’ मंदिराला देणार भेट)

६७ – विराट कोहली (८ शतकं)

६६ – डेव्हिड वॉर्नर (४ शतकं)

५३ – शिखर धवन (२ शतकं)

४५ – रोहित शर्मा (२ शतकं)

४३ – के एल राहुल (४ शतकं)

४३ – एबी डिव्हिलिअर्स (३ शतकं)

(हेही वाचा – IPL 2025, MI vs CSK : घरच्या मैदानावर मुंबईचेच फलंदाज सरस, रोहित शर्मालाही गवसला सूर)

पंजाबच्या ६ बाद १५८ या धावसंख्येचा पाठलाग करताना बंगळुरू संघाने फटकेबाज सलामीवीर फिल सॉल्ट (Phil Salt) झटपट गमावला. पण, त्यानंतर देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आणि विराट यांनी दुसऱ्या गड्यासाठी १०३ धावांची भागिदारी केली. पड्डिकलननेही ३५ चेंडूंत ६१ धावा करताना ४ षटकार खेचले. त्यानंतर रजत पाटीदार (१२) बरोबरही विराटने ३४ धावांची भागिदारी केली. या सगळ्या कालावधीत विराट कोहली (Virat Kohli) खेळपट्टीवर नेटाने उभा राहिला. धावांचा पाठलाग कसा करायचा याचं प्रात्यक्षिकच त्याने दाखवून दिलं. १५ व्या षटकांत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने धावांचा वेग आणखी वाढवला. आणि संघाला विजय मिळवून दिला. त्यापूर्वी कृणाल पंड्या (२/२५) आणि सुयश शर्मा (२/२६) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे बंगळुरूवे पंजाबला १५८ धावांत रोखलं. (IPL 2025, PBKS vs RCB)

या विजयासह बंगळुरू संघाचे ८ सामन्यांतून १० गुण झाले आहेत. ते आता गुण तालिकेत गुजरात आणि दिल्ली कॅपिटल्सच्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर पंजाबचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.