-
ऋजुता लुकतुके
श्रेयस अय्यरने ४१ चेंडूंत नाबाद ८७ धावा करत पंजाब किंग्जला विजयी केलं. कर्णधाराने शेवटपर्यंत मैदानात राहून कठीण प्रसंगीही धीर गंभीर खेळी केली. सामना संपल्यानंतरही अजून अर्धा खेळ बाकी आहे अशीच त्याची भावना होती. त्यामुळे या सामन्यातील चुका विसरायला तो तयार नव्हता. संघ अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे जल्लोषाचं वातावरण असताना श्रेयस अय्यर संघातील पाचव्या क्रमांकावरील फलंदाज शशांक सिंगवर चिडलेला दिसला. हातवारे करून गंभीरपणे तो शशांकला काहीतरी सांगत होता. (IPL 2025, PBKS in Final)
(हेही वाचा – IPL 2025, PBKS in Final : पंजाब किंग्जनी आयपीएलमध्ये केलेले विक्रम)
सामन्यातील शेवटच्या चेंडूवर अश्विनी कुमारला विजयी षटकार मारत श्रेयसने सामना संपवला. पंजाब किंग्जचे खेळाडू आनंद साजरा करण्यासाठी मैदानात घुसले. श्रेयस आणि शशांक आमने सामने येताच दोघांमध्ये काहीशी वादावादी झाली. यात श्रेयस जास्त चिडलेला दिसला. सतराव्या षटकांत शशांक बेजबाबदार पद्धतीने धावचित झाल्यामुळे श्रेयस त्याच्यावर नाराज होता. बराच वेळ आपला मुद्दा आक्रमकपणे तो शशांकला सांगत होता आणि शशांक काही बोलला नाही तरी त्याचा चेहरा पडलेला होता. (IPL 2025, PBKS in Final)
(हेही वाचा – Ukraine Attack : युक्रेनचा मास्टरस्ट्रोक रशियावर पडला भारी ! ‘असा’ आखला हल्ल्याचा कट)
#PBKSvsMI Shreyas Iyer angry on Shashank for His absence in running between games … pic.twitter.com/RCMPwJscvY
— . (@itzfcking18) June 1, 2025
पंजाब २०३ धावांचा पाठलाग करत असताना सतराव्या षटकांत शशांक सिंगने मि़ड-ऑफला चेंडू तटवला. तो हार्दिक पांड्याने अडवला. त्याने चेंडू यष्टीच्या दिशेनं फेकला. सुरुवातीला शशांक क्रीझमध्ये परतलाय असंच सगळ्यांना वाटलं. गोलंदाज ट्रेंट बोल्टने फारसं अपीलही केलं नाही. पण, पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला आणि टीव्ही रिप्लेमध्ये शशांकची बॅट क्रीझमध्ये नसल्याचं दिसलं. त्याने ही धाव गंभीरपणे घेतली नसल्याचं त्याच्या देहबोलीतून दिसलं. तो खेळपट्टीच्या मध्यपर्यंत चक्क चालत होता. शिवाय धाव पूर्ण करतानाही इतर काही फलंदाजांप्रमाणे त्याने चपळाई किंवा झेप घेतली नाही. शशांकने प्रयत्नांत केलेली कसूर श्रेयसला कर्णधार म्हणून आवडली नाही. अर्थात, पंजाबने सामना जिंकला आणि आता आयपीएलच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला आहे. (IPL 2025, PBKS in Final)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community