IPL 2025, PBKS in Final : पंजाब किंग्जनी आयपीएलमध्ये केलेले विक्रम

IPL 2025, PBKS in Final : श्रेयस अय्यरने ४१ चेंडूंत नाबाद ८७ धावा करत विजय मिळवून दिला. 

54
IPL 2025, PBKS in Final : पंजाब किंग्जनी आयपीएलमध्ये केलेले विक्रम
  • ऋजुता लुकतुके

पंजाब किंग्ज संघाने मुंबई इंडियन्सचा ६ चेंडू आणि ५ गडी राखून पराभव केला आणि दिमाखात आयपीएलची अंतिम फेरी गाठली. आता मंगळवारी पंजाबचा मुकाबला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. श्रेयस अय्यरने कप्तानी खेळी करत ४१ चेंडूंत नाबाद ८७ धावा केल्या आणि मैदानावर टिकून राहत त्याने पंजाबला विजयी केलं. ही कामगिरी करताना पंजाबच्या संघाने आयपीएलमध्ये अनेक विक्रम केले आहेत. (IPL 2025, PBKS in Final)

पहिलं म्हणजे मुंबई इंडियन्सचा दोनशे पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करत विजय मिळवणारा पंजाब किंग्ज हा लीगमधील पहिला संघ आहे. यापूर्वी मुंबईने पहिल्या डावांत दोनशे धावा केल्यानंतर त्यांचा कधीही पराभव झाला नव्हता. तर बाद फेरीत सगळ्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून विजय मिळवण्याचा विक्रमही पंजाब किंग्जनी केला आहे. इतकंच नाही तर या लीगमध्ये नऊ वेळा दोनशे किंवा त्याहून जास्त धावांचा यशस्वी पाठलाग झाला आहे. एकाच लीगमध्ये असं सर्वाधिकवेळा झालं आहे. (IPL 2025, PBKS in Final)

(हेही वाचा – Ukraine Attack : युक्रेनचा मास्टरस्ट्रोक रशियावर पडला भारी ! ‘असा’ आखला हल्ल्याचा कट)

मुंबई इंडियन्सचा संघ २०१४ पासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर ५ पैकी फक्त एकच सामना जिंकू शकला आहे. इथली त्यांची कामगिरी यंदाही सुधारली नाही. दुसरीकडे, श्रेयस अय्यरने कप्तान म्हणूनही दमदार कामगिरी केली आहे आणि आपल्या नावावर काही विक्रम चढवले आहेत. लीगमध्ये तीन वेगवेगळ्या फ्रँचाईजींचं प्रतिनिधित्व करताना तीनही संघांना अंतिम फेरीत पोहोचवण्याची किमया त्याने साधली आहे. यात त्याच्या नावावर एक विजेतेपदही आहे. २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्स, २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि आता २०२५ मध्ये पंजाब किंग्जसाठी त्याने कर्णधार म्हणून ही कामगिरी केली आहे. यातील २०२४ मध्ये त्याने विजय साध्य केला आहे. (IPL 2025, PBKS in Final)

अहमदाबादमध्ये रविवारी सामना पावसामुळे दोन तास उशिरा सुरू झाला. आणि नाणेफेक जिंकून पंजाबने मुंबईला पहिली फलंदाजी दिली. मुंबईने सूर्यकुमार यादवचं अर्धशतक आणि तिलक वर्माच्या मौल्यवान ४७ धावांच्या जोरावर निर्धारित २० षटकांत ५ बाद २०३ धावा केल्या. नमन धीरनेही सहाव्या क्रमांकावर येत ३७ धावांचं योगदान दिलं. या धावसंख्येला उत्तर देताना पंजाबची अवस्था ३ बाद ७३ अशी झाली होती. पण, तिथून श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा यांनी पंजाबचा डाव सावरला. तिथून पुढे श्रेयसने समयोचित फलंदाजी आणि आक्रमकता यांचा मिलाफ घडवून आणत पंजाबला विजयी केलं. जसप्रीत बुमराहची जादू चालली नाही आणि हे मुख्य अस्त्र बोथट झाल्यावर पंजाबचं काम सुकर झालं. श्रेयस अय्यरने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत विजय साध्य केला. (IPL 2025, PBKS in Final)

(हेही वाचा – India A vs England Lions : टॉम हेन्स, मॅक्स होल्डन यांच्या शतकामुळे इंग्लंड लायन्सचं भारताला दमदार उत्तर)

श्रेयस अय्यरने हंगामातील सातवं अर्धशतक ठोकताना ४१ चेंडूंत नाबाद ८७ धावा केल्या आणि यात ८ षटकार मारले. पंजाब किंग्जच्या संघाने २०१४ नंतर पहिल्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सनी त्यांचा अंतिम फेरीत पराभव केला होता. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २००९, २०११ आणि २०१६ मध्ये अंतिम फेरी गाठली आहे. या तीनही खेपेला त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. (IPL 2025, PBKS in Final)

बाद फेरीत पंजाबने २०३ धावांचा यशस्वी पाठलाग करत एक मापदंड सर केला आहे : 
  • बाद फेरीत सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग.
  • मुंबई इंडियन्सविरुद्ध दुसऱ्या डावांत दोनशेपेक्षा जास्त धावा करत कुठल्याही संघाने मिळवलेला पहिलाच विजय.
  • पंजाब किंग्जनी आठव्यांदा दोनशे पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला. हा आयपीएलमधील विक्रम आहे.
  • या हंगामात दोनशे पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग नवव्यांदा झाला. लीगमध्ये हा विक्रम आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.