IPL 2025, New Schedule : आयपीएलचं नवीन वेळापत्रक जाहीर, ३ जूनला अंतिम सामना

78

ऋजुता लुकतुके

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव निवळल्यानंतर आता आयपीएलचे उर्वरित सामने १७ मे पासून पुन्हा सुरू होणार आहेत. आणि अंतिम सामना ३ जूनला होणार आहे. (IPL 2025, New Schedule) बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी अधिकृत पत्रक काढून ही घोषणा केली आहे. ‘आयपीएल पुन्हा सुरू होत आहे, हे कळवायला आम्हाला आनंद होत आहे. १७ मे पासून ३ जूनपर्यंत, ६ मैदानांवर उर्वरित १७ सामने खेळवण्यात येतील. बाद फेरीच्या तारखा ठरल्या असल्या तरी सामने कुठे होणार हे काही दिवसांत निश्चित केलं जाईल,’ असं सैकिया यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा – India-Pakistan War : जिहाद करणे हे पाकिस्तानी सैन्याचे कामच आहे; अहमद शरीफ यांचा व्हिडिओ व्हायरल)

सुधारित वेळापत्रकानुसार, २७ मेला साखळी सामने संपतील. आणि २७ तारखेच्या विश्रांतीनंतर २८ पासून बाद फेरीचा थरार रंगेल. बाद फेरीचं वेळापत्रक खालील प्रमाणे असेल,

  • २९ मे – पहिला पात्रता सामना (क्वालिफायर १)
  • ३० मे – बाद सामना (एलिमिनेटर)
  • १ जून – दुसरा पात्रता सामना (क्वालिफायर २)
  • ३ जून – अंतिम सामना

आता साखळी सामन्यांच्या वेळापत्रकावर एक नजर टाकूया. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders) या सामन्यापासून नवीन वेळापत्रकाची सुरुवात होणार आहे. हा सामना (rcb vs kkr) १७ मेला बंगळुरू (Bangalore) इथं खेळवण्यात येईल. तर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज हा ८ मे रोजी अर्धवट राहिलेला सामना आता २४ मे रोजी जयपूर इथं खेळवण्यात येणार आहे. बाकी सामन्यांचं सुधारित वेळापत्रक पाहूया,

आयपीएल २०२५ चं सुधारित वेळापत्रक 

तारीख, दिवस

वेळ

सामना

ठिकाण

शनिवार, १७ मे

संध्या ७.३०

बंगळुरू वि कोलकाता

बंगळुरू

रविवार, १८ मे

दुपारी ३.३०

राजस्थान वि. पंजाब

जयपूर

रविवार, १८ मे

संध्या ७.३०

दिल्ली वि. गुजरात

दिल्ली

सोमवार, १९ मे

संध्या ७.३०

लखनौ वि. हैद्राबाद

लखनौ

मंगळवार, २० मे

संध्या ७.३०

चेन्नई वि. राजस्थान

नवी दिल्ली

बुधवार, २१ मे

संध्या ७.३०

मुंबई. वि. दिल्ली

मुंबई

गुरुवार, २२ मे

संध्या ७.३०

गुजरात व लखनौ

अहमदाबाद

शुक्रवार, २३ मे

संध्या ७.३०

बंगळुरू वि हैद्राबाद

बंगळुरू

शनिवार, २४ मे

संध्या ७.३०

पंजाब वि. दिल्ली

जयपूर

रविवार, २५ मे

दुपारी ३.३०

गुजरात वि चेन्नई

अहमदाबाद

रविवार, २५ मे

संध्या ७.३०

हैद्राबाद वि कोलकाता

नवी दिल्ली

सोमवार, २६ मे

संध्या ७.३०

पंजाब वि. मुंबई

जयपूर

बुधवार, २७ मे

संध्या ७.३०

लखनौ वि. बंगळुरू

लखनौ

शुक्रवार, २९ मे

संध्या ७.३०

पहिला पात्रता सामना

शनिवार, ३० मे

संध्या ७.३०

बाद सामना

रविवार, १ जून

संध्या ७.३०

दुसरा पात्रता सामना

मंगळवार, ३ जून

संध्या ७.३०

अंतिम सामना


हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.