
-
ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्स संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये आपला सलामीचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध गमावला. हा सामना रविवारी गमावल्यानंतर सोमवारी लगेचच मुंबईचा संघ अहमदाबादला रवाना झाला. मंगळवारपासून संघासाठी दोन दिवासांचं संघ बांधणी शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. अहमदाबादजवळ जामनगरमध्ये हे शिबीर होणार आहे. मुंबई संघाचा पुढील सामना २९ मार्चला गुजरात टायटन्स विरुद्ध अहमदाबाद इथंच होणार आहे. त्यापूर्वी खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी संघ प्रशासनाकडून ही युक्ती योजण्यात आली आहे. (IPL 2025)
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर हा संघ पुन्हा एकदा अहमदाबादला रवाना होईल. पहिल्या सामन्यात चिदंबरम मैदानावर फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर मुंबईचा संघ पुरेशी धावसंख्या रचू शकला नाही. आणि संध्याकाळच्या दवात चेन्नई फलंदाजांना मात्र तुलनेनं फलंदाजी करणं सोपं गेलं. मुंबईने ९ बाद १५५ धावा केल्या. यात एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. तर माजी कर्णधार रोहीत शर्मा शून्यावरच बाद झाला. संघासाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती ती तिलक वर्माची ३१. २०१३ नंतर एकदाही मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलमध्ये सलामीचा सामना जिंकू शकलेला नाही. (IPL 2025)
(हेही वाचा – Kunal Kamra ला वाढीव मुदत देण्यास पोलिसांचा नकार; बजावले दुसरे समन्स)
नियमित कर्णदार हार्दिक पांड्या एका सामन्याच्या बंदीमुळे हा सामना खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपलब्धतेमुळे सुर्यकुमार यादवने संघाचं नेतृत्व केलं. मुंबई संघाने आता गुजरात विरुद्धच्या सामन्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. यंदा संघाचा मुंबईतील पहिला सामना येत्या ३१ मार्चला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्घ होणार आहे. (IPL 2025)
मुख्य तेज गोलंदाज जसप्रीत बुमरा अजूनही मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात शामील झालेला नाही. पाठीच्या दुखापतीनंतर तो बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत तंदुरुस्तीवर मेहनत घेत आहे. तो नेमका कधी मुंबईसाठी खेळणार हे अजून स्पष्ट नाही. ‘बुमराची तब्येत चांगली आहे. आणि दुखापतीतून तो सावरतोय. मुंबई इंडियन्स प्रशासन बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाशी संपर्कात आहे. आणि त्यांच्या परवानगीनंतर बुमरा आयपीएल खेळू शकेल. तो लवकरच आम्हाला येऊन मिळेल,’ असं मुंबई इंडियन्सचे गोलंदाजीचे प्रशिक्षक पारस म्बांब्रे यांनी सांगितलं. (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community