ऋजुता लुकतुके
IPL 2025, Mumbai Indians : या हंगामात सुरुवातीपासून मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचाईजी रोहीत शर्माला फक्त फलंदाजीसाठी मैदानात उतरवत आहे. त्यासाठी त्याचा वापर इम्पॅक्ट खेळाडू म्हणून केला जात आहे. या मागचं खरं कारण संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी उघड केलं आहे. ‘सुरुवातीचे काही सामने रोहीत खेळला. त्यानंतर आम्ही त्याचा वापर इम्पॅक्ट सब म्हणून केला आहे. कारणं दोन आहेत. एकतर संघात दुहेरी भूमिका निभावणारे अष्टपैलू खेळाडू आहेत. आणि त्यांना संघात स्थान मिळावं हा एक हेतू होता. तर दुसरा म्हणजे चॅम्पियन्स करंडकापासून रोहीतला एक किरकोळ दुखापत आहे. आणि ती भरून निघण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून आम्ही त्याला पूर्ण सामना खेळवत नाही,’ असं जयवर्धने यांनी स्पष्ट केलं. (IPL 2025, Mumbai Indians )
(हेही वाचा – राज्याची Cabinet meeting चौंड येथे होणार; नेमक्या कोणत्या विषयांवर होणार चर्चा ? वाचा )
रोहीतने यंदा ११ सामने खेळताना ३ अर्धशतकांसह २९३ धावा केल्या आहेत. आणि फलंदाज म्हणून तो संघाच्या कामगिरीत हातभार लावत आहे. ‘त्याला पुरेशी विश्रांती मिळावी आणि शरीरावर ताण येऊ नये म्हणून निव्वळ फलंदाज म्हणून आम्ही त्याचा वापर करत आहोत. त्याची फलंदाजी ही संघासाठी मजबुती आणणारी गोष्ट आहे,’ असं जयवर्धन शेवटी म्हणाले.
मुंबई इंडियन्सचा मंगळवारी सामना गुजरात टायटन्सशी (Gujarat Titans) होणार आहे. आतापर्यंत मुंबई संघाची धावगती इतर सर्व संघांपेक्षा सरस आहे. आणि बाद फेरी गाठण्यासाठी उर्वरित ३ सामन्यांतून २ सामने जिंकण्याची मुंबईला गरज आहे. संघाचा फॉर्म बघता शेवटचे सलग सहा सामने त्यांनी जिंकले आहेत. आणि आता गुजरात विरुद्ध विजय मिळवून गुण तालिकेत अव्वल जाण्याची संधी त्यांच्याकडे आहे.
(हेही वाचा – India-Pakistan War : ७ मे ला देशात ‘मॉक ड्रिल’ आदेश ; याआधी केव्हा करण्यात आले होते ?)
किंबहुना मुंबई इंडियन्स किंवा गुजरात टायटन्स यांच्यापैकी जो संघ जिंकेल तो सरस धावगतीच्या आधारे अव्वल स्थानावर पोहोचणार आहे. सध्या मुंबई इंडियन्स दुसऱ्या तर गुजरात टायटन्स तिसऱ्या स्थानावर आहेत. दोघांचेही ३ – ३ सामने बाकी आहेत. मुंबई (Mumbai) उर्वरित ३ सामन्यांपैकी आपले २ सामने घरच्या मैदानावर खेळणार आहे. तर उर्वरित एक सामना लखनौविरुद्ध एकाना स्टेडिअमवर खेळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community