IPL 2025, MI vs SRH : हैद्राबादचा इशान किशन बाद नसतानाही मैदान सोडून का गेला? १० सेकंदाचा अभूतपूर्व गोंधळ

स्नीकोमीटरमध्ये चेंडू किशनच्या बॅटला लागला नसल्याचं स्पष्ट झालं.

124
IPL 2025, MI vs SRH : हैद्राबादचा इशान किशन बाद नसतानाही मैदान सोडून का गेला? १० सेकंदाचा अभूतपूर्व गोंधळ
IPL 2025, MI vs SRH : हैद्राबादचा इशान किशन बाद नसतानाही मैदान सोडून का गेला? १० सेकंदाचा अभूतपूर्व गोंधळ
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद (MI vs SRH) या सामन्यात सुरुवातीच्या पंधरा मिनिटांतच एक नाट्य उलगडलं. सामन्यातील तिसऱ्या षटकांत तिसऱ्याच चेंडूवर हे नाट्य घडलं. दीपक चाहरच्या (Deepak Chahar) लेगसाईडला वळलेल्या चेंडूला इशान किशनची (Ishan Kishan) बॅट हलका स्पर्श करून गेली असं प्रथमदर्शनी वाटलं. पण, पंचांनी चेंडू वाईड दिला. याचाच अर्थ त्यांना बॅटला स्पर्श झाल्यासारखं वाटत नव्हतं. पण, इशानने पंचांच्या निर्णयाची वाटही नाही बघितली. आणि बॅटची कड लागलीय असं समजून तो तंबूच्या दिशेनं चालायला लागला. पंचांनी वाईड दिला असल्यामुळे तो का जातोय, असं वाटून सगळेच बुचकाळ्यात पडले.

त्यात पुढील मजा म्हणजे मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंनी आपलं अपील सुरूच ठेवलं होतं. इशान किशनला (Ishan Kishan) माघारी फिरताना पाहून पंचांनी आपला आधीचा निर्णय बदलला. आणि त्यांचं बोट वर गेलं. म्हणजे आता पंचांचा अधिकृत निर्णय होता, इशान बाद असल्याचा. मुंबईच्या खेळाडूंचा जल्लोष सुरू झाला. पण, स्नीकोमीटरमध्ये वेगळंच सत्य समोर आलं. (IPL 2025, MI vs SRH)

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : पहलगाममधील हल्ल्यानंतर श्रीनगरसाठीचे विमान तिकीट दर वाढवणाऱ्या विमान कंपन्यांना सरकारची चपराक)

(हेही वाचा – Beed : एकाच्या बदल्यात २५०; कुत्र्यांनी १ पिल्लू मारल्यावर माकडांनी ‘असा’ घेतला बदला)

स्नीकोमीटरमध्ये चेंडू बॅटच्या जवळून जाताना एक सरळ रेषा दिसत होती. म्हणजेच चेंडू बॅटला लागलेलाच नव्हता. पण, एव्हाना इशान किशन (Ishan Kishan) मैदान सोडून गेलेला होता. पंचांनीही आपला निर्णय फिरवलेला होता. खेळाडूंनी तिसऱ्या पंचांची मदतही न घेतल्यामुळे हा निर्णय कायम राहिला. इशान किशन (Ishan Kishan) १ धाव करून बाद झाला. हे सगळं नाट्य काही मिनिटांचं होतं. पण, त्याची भरपूर चर्चा सामनाभर होत राहिला. कारणष हैद्राबादच्या पतनाला तेव्हापासूनच सुरूवात झाली. हैद्राबाद संघाने सलामीवीर ट्रेव्हिस हेडला (Travis Head) पहिल्याच षटकांत शून्यावर गमावलं होतं. आणि इशान झटपट बाद झाल्यावर त्यांची अवस्था २ बाद ३ अशी झाली. आणि पुढे पहिले ५ फलंदाज ३५ धावांत बाद झाले. (IPL 2025, MI vs SRH)

हेनरिक क्लासेनने (Heinrich Klaasen) ४४ चेंडूंत ७१ आणि अभिनव मनोहरने (Abhinav Manohar) ४३ धावा करत हैद्राबादला निदान ७ बाद १४३ धावांचा टप्पा गाठून दिला. पण, अखेर हा सामना मुंबईने ८ गडी आणि २६ चेंडू राखून आरामात जिंकला. मुंबई इंडियन्सनी या हंगामातील दोनही सामन्यांत हैद्राबादचा पराभव केला आहे. तर हैद्राबादचा संघ ८ पैकी ६ सामने गमावल्यामुळे गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. (IPL 2025, MI vs SRH)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.