- ऋजुता लुकतुके
स्पर्धा ऐन रंगात आलेली असताना अखेर मुंबई इंडियन्सना सूर गवसला आहे. तर सनरायझर्स हैद्राबादचा पाय आणखी खोलात जाताना दिसतोय. हंगाम सुरू होण्यापूर्वीच आयपीएलमध्ये ३०० धावांचा विक्रम करण्याची वल्गना करणाऱ्या सनरायझर्स हैद्राबादची मुंबईसमोर अवस्था ४ बाद १३ अशी झाली होती. त्यानंतर ९व्या षटकांत ५ बाद ३५. पण, हेनरिक क्लासेनने (Heinrich Klaasen) एकहाती ७१ धावा करत हैद्राबादला निदान दीडशेच्या जवळ आणलं. तर इम्पॅक्ट सब म्हणून संघात घेतलेल्या अभिनव मनोहरनेही (Abhinav Manohar) ३७ चेंडूंत ४३ धावा केल्या. आणि सामन्यात निदान रंगत निर्माण झाली.
बाकी ट्रेव्हिस हेड (०), अभिषेक शर्मा (८), इशान किशन (१), नितिश कुमार रेड्डी (२) यांनी खेळपट्टीवर आल्या आल्याच तंबूत परतण्याची स्पर्धा लावली होती. अर्थात, या पडझडीला कारण ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर या मुंबईच्या आघाडीच्या गोलंदाजांचे अचूक यॉर्कर हे ही एक कारण होतं. ट्रेंट बोल्टने (Trent Boult) तर ४ षटकांत २५ धावा देत ४ महत्त्वाचे बळी मिळवले. बाकी जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) ४ षटकांमध्येही ३९ धावा निघाल्या. खरंतर राजीव गांधी स्टेडिअमची खेळपट्टी फारशी खराब नव्हती. आणि पूर्वी इथेच अडीचशे धावा झालेल्या होत्या. त्यामुळे हैद्राबादचं १४४ धावांचं आव्हान मुंबईसाठी फारसं कठीण नव्हतंच. त्यातच रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या तिसऱ्या जोडीने त्यांची गोलंदाजीही किरकोळ भासेल अशी फलंदाजी केली. (IPL 2025, MI vs SRH)
(हेही वाचा – Chhattisgarh मध्ये सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांना घेरलं ; ५ नक्षलवादी ठार)
4️⃣th consecutive win for the @mipaltan 👌
They make it 2️⃣ in 2️⃣ against #SRH this season 👏
Scorecard ▶ https://t.co/nZaVdtwDtv #TATAIPL | #SRHvMI pic.twitter.com/wZMMQnOEi0
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2025
(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack : दहशतवादी हल्ल्यासाठी पहलगामच का ? वाचा सविस्तर …)
या सामन्यात मुंबईसाठी जमेच्या अनेक बाजू होत्या. रायन रिकलटन (Ryan Rickelton) सलग दुसऱ्या सामन्यांत स्वस्तांत बाद झाला असला तरी रोहित शर्मा (Rohit Sharma) फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने आपल्या भात्यातील सगळे फटके प्रेक्षकांना दाखवून दिले. मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी करत ४६ चेंडूंत ७० धावांची नितांत सुंदर खेळी केली. शिवाय सूर्यकुमार यादवबरोबर (Suryakumar Yadav) त्याने ५६ धावांची भागिदारी केली. दोघांचा धावांचा वेग असा होता की, सोळाव्या षटकांतच मुंबईने आवश्यक १४३ धावा पूर्ण केल्या. रोहितने ३ तर सुर्याकुमारने २ षटकार ठोकले. सूर्यकुमारला टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज का म्हणतात याची आठवण करून देणारी ही खेळी होती. त्याने १९ चेंडूंत नाबाद ४० धावा करताना फटकेबाजीसाठी नवीन फटके शोधून काढले. ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही आता सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. (IPL 2025, MI vs SRH)
ट्रेंट बोल्ट, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह यांची गोलंदाजी, रोहित, सूर्यकुमारचा फॉर्म आणि हार्दिक पंड्याचा अष्टपैलू खेळ यांच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा संघ स्पर्धेत मोक्याच्या क्षणी आगेकूच करताना दिसत आहे. सरस धावगतीच्या आधारे ९ सामन्यांत १२ गुण मिळवत त्यांनी आता गुण तालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. आता रविवारी मुंबईचा मुकाबला घरच्या मैदानावर लखनौ सुपरजायंट्सबरोबर होणार आहे. तर सनरायझर्स हैद्राबादचा संघ तळातून दुसऱ्या स्थानावर आहे. (IPL 2025, MI vs SRH)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community