IPL 2025, MI vs RR : राजस्थानचा १०० धावांनी पराभव करत मुंबई अव्वल, राजस्थान शर्यतीतून बाहेर 

ज्या मैदानावर मुंबईने २ बाद २१७ धावा केल्या तिथे राजस्थान ११७ धावांत सर्वबाद 

59

ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनी (Mumbai Indians) आपली विजयी घोडदौड सुरू ठेवताना राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) १०० धावांनी पराभव केला आहे. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत १४ गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. तर राजस्थानचा संघ बाद फेरीच्या शर्यतीतून बाद झाला आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर हंगामातील आपला ११ वा सामना खेळणाऱ्या मुंबईने २ गडी गमावून २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ १६.१ षटकात ११७ धावांवर सर्वबाद झाला. (IPL 2025, MI vs RR)

(हेही वाचा – Mumbai Crime : अंधेरीत बॉम्ब ठेवल्याची अफवा ; संशयीत ताब्यात)

राजस्थानचा ११ सामन्यांतील हा आठवा पराभव ठरला. हा संघ फक्त ३ विजयांसह ६ गुणांसह आठव्या स्थानावर आहे आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. उर्वरित तीनही सामने जिंकल्यानंतरही राजस्थानचे फक्त १२ गुण होतील, जे पात्रता फेरीसाठी पुरेसे नाहीत. या विजयासह, मुंबईने प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा आपला मार्ग आणखी मजबूत केला आहे. संघाने ११ सामन्यांत सातवा विजय मिळवला. संघ ४ पराभवांसह १४ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला. आता संघाला स्वतःच्या बळावर पात्र होण्यासाठी उर्वरित ३ पैकी फक्त २ सामने जिंकावे लागतील.

शुक्रवारी गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामना होणार आहे. हैदराबाद ९ सामन्यांत ३ विजय आणि ६ पराभवानंतर ६ गुणांसह ९ व्या स्थानावर आहे. आजचा सामना जिंकून, संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवेल. त्यानंतर हैद्राबादला उर्वरित ४ सामने जिंकावे लागतील आणि त्यांचा धावगती दर इतर संघांपेक्षा चांगला ठेवावा लागेल. तथापि, जर शुक्रवारी हैदराबाद हरले तर प्लेऑफच्या शर्यतीत त्यांना अडचणी येतील. मग उर्वरित सामने जिंकण्यासाठी संघाला इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल.

गुजरात टायटन्सचे (Gujarat Titans) ९ सामन्यांत ६ विजय आणि ३ पराभवांसह १२ गुण आहेत. आजचा सामना जिंकून संघ १४ गुणांसह पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकतो. यासाठी संघाला आपला धावगती दर मुंबईपेक्षा वर ठेवावा लागेल. जर शुक्रवारी GT हरला तर संघाला स्वतःच्या बळावर प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी उर्वरित 4 पैकी 3 सामने जिंकावे लागतील.

मुंबईचा सूर्यकुमार यादव हंगामातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याच्याकडे आता ११ सामन्यांमध्ये ४७५ धावा आहेत. गुजरातचा साई सुदर्शन दुसऱ्या स्थानावर आहे, त्याने ९ सामन्यांमध्ये ४५६ धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर, आरसीबीच्या विराट कोहलीने १० सामन्यांमध्ये ४४३ धावा केल्या आहेत. शुक्रवारी १९ धावा करून जीटीचा साई सुदर्शन ऑरेंज कॅप मिळवू शकतो.

(हेही वाचा – Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये पावसाचा हाहाकार ! महाराष्ट्रतही पाऊस बरसणार ?)

आरसीबीचा जोश हेझलवूड १८ विकेट्ससह सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. गुजरातचा प्रसिद्ध कृष्णा १७ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. जर त्याने शुक्रवारी एक विकेट घेतली तर तो पहिल्या क्रमांकावर पोहोचेल. काल मुंबईच्या ट्रेंट बोल्टने राजस्थानच्या 3 फलंदाजांना बाद केले. तो आता १६ विकेट्ससह या लीडर बोर्डवर तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.