IPL 2025, MI vs LSG : घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा आणखी एक दमदार विजय, लखनौला ५४ धावांनी हरवलं

81
IPL 2025, MI vs LSG : घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा आणखी एक दमदार विजय, लखनौला ५४ धावांनी हरवलं
IPL 2025, MI vs LSG : घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा आणखी एक दमदार विजय, लखनौला ५४ धावांनी हरवलं
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये हा आठवडा बदला घेण्याचा आठवडा म्हणून चाहत्यांमध्ये साजरा होतोय. कारण तेच दोन संघ या आठवड्यात पुन्हा एकदा आमने सामने येतायत. फक्त मैदान बदललेलं आहे. यापैकी मुंबईने घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आपल्या पराभवाचा बदला रविवारी पूर्ण केला. पण, मुंबईने तो पूर्ण केला म्हणण्यापेक्षा लखनौने तो करू दिला असं म्हणणं योग्य ठरेल. कारण, मुंबईच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य आहे त्यांची नैसर्गिक फटकेबाजी आणि मनमुराद षटकार खेचण्याची शैली. त्याला आवर घालणं लखनौच्या गोलंदाजांना जमलं नाही. आणि त्यानंतर फलंदाजी करतानाही आघाडीच्या फलंदाजांकडून चुका झाल्या. त्यांचा अख्खा संघ १६१ धावांत बाद झाला. आणि मुंबईने ५४ धावांनी विजय साकारला.

(हेही वाचा – Terrorist : पाकड्यांना भारताच्या सैनिकी कारवाईची भीती; बिळात जाऊन लपले दहशतवादी)

विजयासाठी २१६ धावांचं आव्हान तसं कठीणच होतं. आणि जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) अचूकता आणि विल जॅक्सची (Will Jacks) फिरकी यांनी आव्हान आणखी कठीण केलं. बुमराहच्या पहिल्या षटकात त्याने पहिले ३ चेंडू निर्धाव दिले. जम बसलेल्या एडन मार्करमचाही (Aiden Markram) संयम सुटला. आणि चौथा चेंडू त्याने टोलवण्याचा प्रयत्न केला. त्या नादात ९ धावांवर तो बाद झाला. विल जॅक्सने (Will Jacks) एकाच षटकांत धोकादायक निकोलस पूरन (२७) आणि ऋषभ पंत (४) यांना बाद केलं. दोघांचीही फटक्याची निवड चुकली. यामुळे लखनौवर दडपण कायम राहिलं. आयुष बदोनी (Ayush Badoni) आणि डेव्हिड मिलर (David Miller) यांनी पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी करत खेळातील रंगत जरुर वाढवली. पण, ट्रेंट बोल्टच्या (Trent Boult) एका उसळलेल्या चेंडूवर आयुष बदोनी ३५ धावांवर बाद झाला. आणि मुंबईसाठी विजय जवळ आला. बुमराहने डेव्हिड मिलरलाही २१ धावांवर बाद केलं. आणि पुढे लखनौच्या आव्हानातील हवाच गेली. मुंबईच्या सर्वच गोलंदाजांनी जबाबदारीने गोलंदाजी केली. बुमराहने तर ४ षटकांत २२ धावा देत ४ बळी मिळवले. बोल्टने ३. विल जॅक्सने २ आणि मुंबईकडून आयपीएल पदार्पण करणाऱ्या कॉर्बिन बॉशने १ बळी मिळवला. (IPL 2025, MI vs LSG)

(हेही वाचा – Pahalgam Attack : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे पाक धार्जिणे वक्तव्य; पाकिस्तान माध्यमांनी केला वापर)

त्यापू्वी मुंबई इंडियन्सनी धोके पत्करले. पण, धावाही वेगाने केल्या. त्यांच्या डावांत एकूण १४ षटकार होते. म्हणजेच ८४ धावा त्यांनी अशाच केल्या. त्यामुळे धावगती आणि एकूण धावांमध्ये खूप फरक पडला. सलामीवीर रायन रिकलटनने ३२ चेंडूंत ५८ धावा केल्या. तर सूर्यकुमारने २८ चेंडूंत ५४ धावाी केल्या. दोघांनीही प्रत्येकी ४ षटकार मारले. विल जॅक्सने २९, नमन धीरने नाबाद २६ तर कॉर्बिन बॉशने २० धावा केल्या. मुंबईच्या अगदी सातव्या फलंदाजानेही षटकार खेचला. (IPL 2025, MI vs LSG)

मुंबईच्या संघाने आता सलग पाच विजयांसग एकूण १२ गुण मिळवले आहेत. आणि सध्या गुण तालिकेत पहिल्या चारांत पोहोचले आहेत. इथं दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये सध्या जोरदार चुरस आहे. आणि स्थान वर खाली होत आहेत. तर सूर्यकुमार यादवही ४२७ धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आधाडीवर पोहोचला आहे. तिथे त्याची चुरस विराट कोहली आणि साई सुदर्शनशी असणार आहे. (IPL 2025, MI vs LSG)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.