IPL 2025 : ‘थँक्यू आर्म्ड फोर्सेस’, राजस्थानविरुध्द पंजाब सामन्यात सैन्यदलांच्या शौर्याला सलाम

भारत-पाकिस्तान तणावानंतर स्थगित करण्यात आलेली आयपीएल(IPL 2025) पुन्हा एकदा सुरू झाली आहे. एका आठवड्याच्या स्थगितीनंतर दि. १७ मे पासून आयपीएल(IPL 2025) सामने पुन्हा खेळविले जात असून रविवारी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना खेळविला जात आहे.

32

भारत-पाकिस्तान तणावानंतर स्थगित करण्यात आलेली आयपीएल(IPL 2025) पुन्हा एकदा सुरू झाली आहे. एका आठवड्याच्या स्थगितीनंतर दि. १७ मे पासून आयपीएल(IPL 2025) सामने पुन्हा खेळविले जात असून रविवारी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना खेळविला जात आहे. या सामन्याच्या सुरूवातीला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेल्या कारवाईबाबत भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आला.

(हेही वाचा ‘तो सूड नव्हता तर…’; Operation Sindoor बाबत भारतीय सैन्याचा नवा व्हिडिओ समोर )

राजस्थान विरुध्द पंजाब यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतादरम्यान ‘थँक्यू आर्म्ड फोर्सेस’ अशा आशयाची स्क्रीन झळकल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर रविवारी पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी सामना अधिकाऱ्यांसह राष्ट्रगीत गाऊन भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम केला. स्टेडियममधील मोठ्या स्क्रीनवर, भारतीय सैन्यासाठी ‘धन्यवाद सशस्त्र दल’ असा संदेश दाखविण्यात आला.

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला असतानाच दि. ०९ मे रोजी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना अचानक फ्लडलाइट बिघाडामुळे स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच बीसीसीआयने दहा संघांची आयपीएल स्पर्धा(IPL 2025) अधिकृतपणे स्थगित करण्याचा निर्णय घेतला. काही वेळानंतर पाकिस्तानी ड्रोन हल्ले झाले होते, ज्यामुळे खेळाडू आणि प्रेक्षकांना ताबडतोब स्टेडियममधून बाहेर काढावे लागल्याचे समोर आले होते. दि. १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमधील युध्दविरामानंतर बीसीसीआयने नवीन वेळापत्रक जारी करत १७ मे रोजी स्पर्धा(IPL 2025) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.(IPL 2025)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.