IPL 2025, M S Dhoni : व्हीलचेअरवर बसलेल्या चाहत्यासाठी जेव्हा धोनी सुरक्षा मोडून पुढे येतो….

महेंद्रसिंग धोनीने आपल्या या कृतीने उपस्थितांची मनं जिंकली.

448
IPL 2025, M S Dhoni : व्हीलचेअरवर बसलेल्या चाहत्यासाठी जेव्हा धोनी सुरक्षा मोडून पुढे येतो….
IPL 2025, M S Dhoni : व्हीलचेअरवर बसलेल्या चाहत्यासाठी जेव्हा धोनी सुरक्षा मोडून पुढे येतो….
  • ऋजुता लुकतुके

महेंद्रसिंग धोनी (M S Dhoni) सह्रदय क्रिकेटपटू म्हणूनच ओळखला जातो. आणि त्याची लोकप्रियताही मोठी आहे. चाहत्यांमध्ये अजूनही त्याच्याविषयी उत्कंठा असते. आणि धोनीही त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागून त्यांची मनं मोडत नाही. तसाच एक प्रसंग लखनौ (LSG) विरुद्घच्या सामन्यानंतर घडला. एकाना स्टेडिअमवरील सामना संपल्यानंतर चेन्नईचा संघ विमानतळावर पोहोचला. तिथे धोनीला (M S Dhoni) पाहताच चाहत्यांचा गराडाही पडला. पण, धोनीभोवती सुरक्षा रक्षकांचं जाळं होतं. पण, धोनीला एका व्हीलचेअरवर बसलेल्या चाहत्याने मोबाईलवर सेल्फी घेण्याची विनंती केली.

धोनीच्या भोवती पोलीस कर्मचारी होते. पण, त्याने थांबून त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण केली. या सामन्यात लखनौच्या १६७ धावांचा पाठलाग करताना धोनीने चेन्नईसाठी ११ चेंडूंत २७ धावांची एक मोलाची खेळीही केली होती. त्यासाठी त्याला सामनावीराचा किताबही मिळाला.

(हेही वाचा – Cashless Treatment : अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार होणार ; आरोग्य खात्याचा मोठा निर्णय)

चेन्नईने या सामन्यांत लखनौचा (LSG) ५ गडी राखून पराभव केला. आणि आपली चार सामन्यांची पराभवाची मालिकाही त्यांनी संपवली. चेन्नईचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) दुखापतीनंतर धोनीच (M S Dhoni) सध्या चेन्नईचं (CSK) नेतृत्व करत आहे. संघाच्या सलग पराभवांसाठी धोनीने चिदंबरम स्टेडिअमवरील खेळपट्टीचं कारण दिलं आहे. ‘आम्हाला चेपक स्टेडिअमवरील (Chepauk Stadium) खेळपट्टी बदलण्याची विचार करायला हवा. चेन्नईकडे चांगले फलंदाज आहेत. आणि अशावेळी खेळपट्टी फलंदाजीला पोषक असेल तर त्याची संघाला मदतच होईल,’ असं धोनीने बोलून दाखवलं आहे.

विशेष म्हणजे धोनीला लखनौविरुद्ध सामनावीराचा पुरस्कार मिळाला. सहा वर्षांनंतर त्याला पहिल्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. ४३ व्या वर्षी हा पुरस्कार जिंकणारा आयपीएलमधील (IPL 2025) तो वयाने सगळ्यात मोठा क्रिकेटपटू ठरला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.