-
ऋजुता लुकतुके
चेन्नई सुपर किंग्जच्या रवींद्र जडेजाने शनिवारी या हंगामातील आतापर्यंतचा सर्वांत लांब षटकार खेचला. बंगळुरूचं चिन्नास्वामी मैदान हे तसं देशातील छोट्या मैदानांपैकी एक आहे. पण, चेन्नईसमोर आव्हान होतं ते २१४ धावांचं. त्याचा पाठलाग करताना आधी आयुष म्हात्रे आणि त्यानंतर रवींद्र जडेजाने चेन्नईसाठी घणाघाती फलंदाजी केली. चौथ्या क्रमांकावर येत जडेजाने ४५ चेंडूंत ७७ धावांची खेळी साकारली आणि यात १७ व्या षटकांत त्याने हा विक्रमी षटकार लगावला. बंगळुरूचा लुंगी एनगिडी एरवी किफायतशीर गोलंदाज ठरला होता. पण, या षटकातील फुलटॉस चेंडू जडेजाने सरळ रेषेत सीमापार तडकावला. तो पार १०९ मीटर लांब गेला. सनरायझर्स हैद्राबादच्या क्लासेनने यापूर्वी मुंबईविरुद्धच्या सामन्यांत १०७ मीटर लांब षटकार खेचला होता. (IPL 2025, Longest Sixes)
जडेजाच्या या झंझावातापूर्वी १७ वर्षीय आयुष म्हात्रेनंही ४८ चेंडूंत ९४ धावांची खेळी करत चेन्नईसाठी विजयाची आशा निर्माण केली होती. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ११७ धावंची तडाखेबंद भागिदारी केली. पण, तरीही अखेरच्या क्षणी फलंदाज बाद झाल्यामुळे चेन्नईला दोन धावा विजयासाठी कमीच पडल्या. यश दयालने सामन्यातील शेवटचं षटक प्रचंड तणाव असताना शांतपणे टाकलं आणि बंगळुरूला विजय मिळवून दिला. जडेजाचा सर्वात लांब षटकार पाहूया, (IPL 2025, Longest Sixes)
(हेही वाचा – IPL 2025, Virat Kohli : आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नावावर अभूतपूर्व विक्रम)
109m six! 👏
Ravindra Jadeja hit a MONSTROUS maximum during his fighting knock of 77*(45)! 🔥
Watch his full knock▶️ https://t.co/76RyGG8wAn#TATAIPL | #RCBvCSK | @ChennaiIPL | @imjadeja pic.twitter.com/L5Lv6291pT
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2025
या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आता गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे या हंगामात १०० मीटरपेक्षा जास्त मोठे षटकार एकूण ९ वेळा ठोकले गेले आहेत. तर रविवारी झालेल्या दोन सामन्यांनंतर या हंगामातील एकूण षटकारांची संख्याही ९२९ वर पोहोचली आहे. १०० मीटरच्या वर षटकार खेचणारे खेळाडू बघूया, (IPL 2025, Longest Sixes)
- रवींद्र जडेजा वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (१०९ मीटर)
- हेनरिक क्लासेन वि. सनरायझर्स हैद्राबाद (१०७ मीटर)
- आंद्रे रसेल वि. दिल्ली कॅपिटल्स (१०६ मीटर)
- अभिषेक शर्मा वि. पंजाब किंग्ज (१०६ मीटर)
- फिल सॉल्ट वि. गुजरात टायटन्स (१०५ मीटर)
- ट्रेव्हिस हेड वि. राजस्थान रॉयल्स (१०५ मीटर)
- निकोलस पुरन वि. कोलकाता नाईटरायडर्स (१०२ मीटर)
- अनिकेत वर्मा वि. दिल्ली कॅपिटल्स (१०२ मीटर)
- टीम डेव्हिड वि. पंजाब किंग्ज (१०० मीटर)
- यशस्वी जयस्वाल वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (९९ मीटर)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community