-
ऋजुता लुकतुके
के. एल. राहुलने रविवारी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर आयपीएलच्या या हंगामातील आपलं पहिलं शतक झळकवतानाच विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडला. भारताकडून सर्वात कमी वेळेत आणि सामन्यांमध्ये टी-२० तील ८,००० धावा त्याने पूर्ण केल्या आहेत. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात सलामीला आलेल्या राहुलने डावातील सहाव्या षटकांत कासिगो रबाडाला एक चौकार आणि मागोमाग षटकार खेचत हा विक्रम पूर्ण केला. विराटपेक्षा तब्बल १९ डाव त्याला कमी लागले. राहुलने ८,००० धावा पूर्ण करण्यासाठी २२४ डाव घेतले. तर विराटने २४३ डावांमध्ये ही कामगिरी पूर्वी केली होती. (IPL 2025, KL Rahul)
जागतिक स्तरावर सर्वात जलद ८,००० टी-२० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता राहुल ख्रिल गेल आणि बाबर आझम यांच्या मागोमाग तिसऱ्या स्थानावर आहे. टी-२० प्रकारात राहुलने ६ शतकं आणि ६९ अर्धशतकं केली आहेत. या प्रकारातील भारताचा तो सगळ्यात सातत्यपूर्ण फलंदाज आहे. (IPL 2025, KL Rahul)
(हेही वाचा – Fire : विधानभवनाच्या दारात अचानक आग; स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट, विधिमंडळात खळबळ)
जलद ८,००० टी-२० धावा करणारे फलंदाज :
ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – २१३ डाव
बाबर आझम (पाकिस्तान) – २१८ डाव
के. एल. राहुल (भारत) – २२४ डाव
विराट कोहली (भारत) – २४३ डाव
मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) – २४४ डाव
(हेही वाचा – अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लिहीलेल्या पत्रावर Ashish Shelar म्हणाले …)
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना के. एल. राहुल यावेळी सलामीला आला. खेळपट्टीचा पुरेपूर वापर करत त्याने गुजरात विरुद्ध तडाखेबाज शतक झळकावलं. ६५ चेंडूंत नाबाद ११२ धावा करताना त्याने दिल्लीलाही ३ बाद १९९ अशी धावसंख्या उभारून दिली. पण, हा आनंद अल्पजीवी ठरला. कारण, गोलंदाजांना खेळपट्टीकडून काहीही मदत मिळत नव्हती. अशा खेळपट्टीवर गुजरातच्या शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोन्ही सलामीवीरांनी एकही गडी न गमावता १९ व्या षटकांतच २०० धावांनी नाबाद भागिदारी करत सामना जिंकला. सुदर्शनने हंगामातील दुसरं शतक झळकावताना नाबाद १०५ धावा केल्या. तर गिलही ९३ धावांवर नाबाद राहिला. (IPL 2025, KL Rahul)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community