IPL 2025, KKR vs DC : सीमारेषेवर दुष्मंथा चमीराने पकडलेला डोळ्याचं पारणं फेडणारा झेल

मिचेल स्टार्कचं शेवटचं षटक सनसनाटी ठरलं.

83
IPL 2025, KKR vs DC : सीमारेषेवर दुष्मंथा चमीराने पकडलेला डोळ्याचं पारणं फेडणारा झेल
IPL 2025, KKR vs DC : सीमारेषेवर दुष्मंथा चमीराने पकडलेला डोळ्याचं पारणं फेडणारा झेल
  • ऋजुता लुकतुके

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून कोलकाता संघाने पहिली फलंदाजी घेतली, तेव्हा त्यांचा इरादा दोनशे पार जाण्याचा दिसतच होता. पहिल्या पॉवर प्लेमध्येच त्यांनी ७६ धावा कुटल्या होत्या. पण, त्यानंतर ठरावीक अंतराने फलंदाजही बाद होत गेले. पहिल्या चार फलंदाजांनी केलेल्या धावा आणि अंगक्रिश रघुवंशीने (Angkrish Raghuvanshi) केलेल्या ४४ धावा तसंच रिंकू सिंगच्या (Rinku Singh) ३६ धावा यामुळे कोलकाता संघ दोनशेच्या जवळ पोहोचलाही होता. पण, शेवटच्या षटकांत कोलकाताने खरोखर दोनशे धावांना नाट्यमय पद्धतीने गवसणी घातली. मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc) या षटकांत भरपूर सनसनाटी होती.

(हेही वाचा – RTI applications : आरटीआय अर्ज अन् उत्तरेही होणार सार्वजनिक ; माहिती आयुक्तांनी दिले महत्त्वाचे निर्देश)

पहिल्याच चेंडूवर आंद्रे रसेलने (Andre Russell) १०२ मीटर लांब षटकार खेचला. त्यानेच कोलकाता संघ २०० पार गेला. पण, नंतरचे दोन चेंडू निर्धाव गेल्यावर अखेरच्या ३ चेंडूंवर फलंदाज पुन्हा बाद झाले. यातील अनुकूल रॉयचा सीमारेषेवर चमिराने घेतलेला झेल हा डोळ्याचं पारणं फेडणारा होता. स्टार्कने अनुकूलच्या पॅडवर टाकलेला चेंडू त्याने बॅकवर्ड शॉर्टलेगला टोलवला. चेंडू सीमापार जाणार हे निश्चित दिसत होतं. इतक्यात तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या दुष्मंथा चमीराने (Dushmantha Chameera) आपल्या डाव्याबाजूला झेपावत लांब सूर मारला आणि चक्क हा झेल टिपला. आयपीएलच्या (IPL 2025) इतिहासातील सर्वोत्तम झेलांपैकी एक म्हणून याची गणना होईल. (IPL 2025, KKR vs DC)

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack: पाकिस्तानची उलटी गिनती सुरू; ‘हे’ केंद्रीय मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला)

झेल पूर्ण झाल्यावर खुद्द गोलंदाज मिचेल स्टार्कलाही (Mitchell Starc) त्यावर विश्वास बसत नव्हता. तर अनुकूल रॉयही भांबावला होता. मैदानात प्रेक्षकांनी मात्र जल्लोष सुरू केला. आणि चमीराच्या नावाचा गजर झाला. सोशल मीडियावरही या झेलाचं कौतुक सुरू झालं. (IPL 2025, KKR vs DC)

त्याच्या पुढच्याच चेंडूवर आंद्रे रसेलही (Andre Russell) धावचित झाला. आणि अखेर कोलकाताने निर्धारित २० षटकांत ९ बाद २०४ धावा केल्या. दिल्लीने या धावसंख्येचा नेटाने पाठलाग केला. फाफ डू प्लेसीने (Faf du Plessis) ६२ धावा करत एक बाजू लावून धरली होती. अक्षर पटेलनेही (Axar Patel) ४३ धावा करत त्याला साथ दिली. पण, सुनील नरेनने (Sunil Narine) एका षटकांत २ मोलाचे बळी मिळवत सामना कोलकातासाठी खेचून आणला. तर त्यानेच धोकादायक के एल राहुलला (KL Rahul) धावचितही केलं. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दिल्लीचा संघ २० षटकांत ९ बाद १९० धावाच करू शकला. आणि कोलकाताचा १४ धावांनी विजय झाला. (IPL 2025, KKR vs DC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.