IPL 2025, Kagiso Rabada : बंदीनंतर गुजरात टायटन्सचा कासिगो रबाडा आयपीएलमध्ये परतला

IPL 2025, Kagiso Rabada : या हंगामात तो आतापर्यंत फक्त २ सामने खेळला आहे.

73
IPL 2025, Kagiso Rabada : बंदीनंतर गुजरात टायटन्सचा कासिगो रबाडा आयपीएलमध्ये परतला
  • ऋजुता लुकतुके

यंदा दक्षिण आफ्रिकेचा तेज गोलंदाज कासिगो रबाडाने ३ एप्रिलला तडकाफडकी आयपीएल सोडून आपला मायदेश गाठला होता. त्याची फ्रँचाईजी गुजरात टायटन्सने तेव्हा ‘अतिशय खाजगी आणि गोपनीय,’ कारणामुळे तो आयपीएल सोडून जात असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता रबाडा आयपीएलमध्ये परतला आहे. पण, त्याच्या मधल्या गैरहजेरीचं कारण हे त्याच्यावर असलेली उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे आलेली बंदी असल्याचं आता समोर आलं आहे. पण, ही बंदी चौकशी सुरू असेपर्यंत म्हणजे तात्पुरती होती. त्याने घेतलेलं औषध हे कागगिरी वाढवण्यासाठी नसल्याचं सिद्ध झाल्यानंतर ही बंदी हटवण्यात आली आहे. एसए २०-२० स्पर्धा खेळताना रबाडा एमआय केपटाऊन फ्रँचाईजीचं प्रतिनिधित्व करत होता. जानेवारी २०२५ ची ही गोष्ट आहे आणि या स्पर्धेदरम्यान घेतलेल्या एका औषधामुळे तो अडचणीत आला होता. आयसीसीने त्याच्याविरुद्ध कारवाई पूर्ण होईपर्यंत त्याला तात्पुरतं निलंबित केलं होतं. त्यामुळे आयपीएलमध्ये सुरुवातीलाच त्याला घरी परतावं लागलं. (IPL 2025, Kagiso Rabada)

(हेही वाचा – IPL 2025, Longest Sixes : यंदाच्या आयपीएलमधील सर्वात लांब षटकार कुणाचा?)

आता दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटूंच्या संघटनेनं रबाडाच्या अनुपस्थितीचं अधिकृत कारण उघड केलं आहे. त्यानंतर रबाडानेही सोशल माध्यमांवर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी घेतलेल्या एका औषधामुळे माझी उत्तेजक द्रव्य चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे मला तडकाफडकी मायदेशी परतावं लागलं. माझ्यावर पैसे लावणारा माझा संघ, संघसहकारी अशा सगळ्यांचा मी अपराधी आहे. झाल्या प्रकाराचं पूर्ण दायित्व मी स्वीकारतो. मला क्रिकेट खेळायला मिळतं, हे माझं भाग्य आहे आणि ते मी कधीही हलक्यात घेणार नाही,’ असं रबाडाने आपल्या पत्रकात म्हटलं आहे. (IPL 2025, Kagiso Rabada)

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : तुर्कस्तानवर आर्थिक बहिष्कार घाला; ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांचे कळकळीचे आवाहन)

रबाडाने आयपीएल तडकाफडकी सोडण्यापूर्वी दोन सामन्यांत गुजरात टायटन्सचं प्रतिनिधित्व केलं. यात त्याने पंजाब विरुद्ध ४१ धावांत १ बळी तर मुंबई इंडियन्सविरुद्ध ४२ धावांत १ बळी मिळवला होता. गुजरात टायटन्सने यंदाच्या लिलावात कासिगो रबाडाला १०.७५ कोटी रुपये मोजून खरेदी केलं आहे. रबाडाच्या अनुपस्थितीत गुजरात टायटन्सनी या हंगामात प्रभावी कामगिरी केली आहे. १० पैकी ७ सामने जिंकून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. मंगळवारी मुंबई इंडियन्सबरोबरच्या सामन्यासाठी रबाडा उपलब्ध असल्यामुळे संघाची ताकद आता आणखी वाढली आहे. उर्वरित ३ सामन्यांपैकी २ जिंकले तरी गुजरात बाद फेरीत स्थान मिळवू शकेल. (IPL 2025, Kagiso Rabada)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.