IPL 2025, Foreign Players : परदेशी खेळाडू भारतात सुट्टीला आल्यासारखे वागतात; विरेंद्र सेहवाग याचा टोला

आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंची कामगिरी हा चर्चेचा विषय असतो.

73
IPL 2025, Foreign Players : परदेशी खेळाडू भारतात सुट्टीला आल्यासारखे वागतात; विरेंद्र सेहवाग याचा टोला
IPL 2025, Foreign Players : परदेशी खेळाडू भारतात सुट्टीला आल्यासारखे वागतात; विरेंद्र सेहवाग याचा टोला
  • ऋजुता लुकतुके

भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हा आपल्या परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. आताही आयपीएलमध्ये खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंवर (Foreign Players) त्याने थेट भाष्य केलं आहे. ‘लिव्हिंगस्टोन, मॅक्सवेल सारख्या खेळाडूंची धावांची भूक कमी झालीय असं मला वाटतं. ते इकडे येतात, मजा करतात आणि निघून जातात. त्यांना आयपीएल (IPL 2025) म्हणजे सुट्टी घालवण्याचं ठिकाण वाटतं. संघासाठी खेळावं असं त्यांना वाटतच नाही,’ असं सेहवागने क्रिकबझ या वेबसाईटशी बोलताना म्हटलं आहे. दोघांच्या खेळात टिकून राहण्याचा आणि धावा करण्याचा प्रयत्नच दिसत नाही, असं सेहवागचं म्हणणं आहे.

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) एरवी टी-२० प्रकारात त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण, गेल्या दोन हंगामांत तो नेहमीसारखी फलंदाजी करू शकलेला नाही. ६ सामन्यांत ८.२ धावांच्या सरासरीने त्याने फक्त ४२ धावा केल्या आहेत. गेल्या हंगामातही मॅक्सवेल बंगळुरूकडून खेळताना अर्ध्या हंगामात थकवा जाणवत असल्याचं म्हणत मायदेशी परतला होता. त्यानंतर तो परतला. पण, त्याच्याकडून धावा काही झाल्या नाहीत.

(हेही वाचा – देशाबाहेर जाऊन बदनामी करण्याची Rahul Gandhi यांची परंपरा चालूच; म्हणे, निवडणूक आयोगाने तडजोड केली)

मॅक्सवेल (Glenn Maxwell) अष्टपैलू खेळाडू आहे. ८ धावांच्या सरासरीने आतापर्यंत त्याने ४ बळी मिळवले आहेत. दुसरीकडे, लियम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) थोडीफार आक्रमकता दाखवताना काही वेळा फटकेबाजी केली आहे. पण, ७ सामन्यांत त्याने एका अर्धशतकासह एकूण फक्त ८७ धावा केल्या आहेत. त्यातून त्याच्या कामगिरीतील सातत्याचा अभाव अधोरेखित होतो. बंगळुरू फ्रँचाईजीने लिव्हिंगस्टोनसाठी ८.७५ कोटी रुपये मोजले आहेत.

सेहवागने (Virender Sehwag) क्रिकबझच्या मुलाखतीत परदेशी खेळाडूंच्या (Foreign Players) कमगिरीवर सविस्तर चर्चा केली आहे. ‘मी आयपीएल (IPL 2025) खेळत असताना अनेक खेळाडूंबरोबर खेळलो आहे. ते सगळे आता माजी खेळाडू आहेत. पण, १-२ सोडले तर कोणामध्येच मला धावांची भूक दिसली नाही. आयपीएलकडे (IPL 2025) बघण्याचा त्यांचा दृष्टीकोण फारसा गंभीर नसतो,’ असं निरीक्षणही सेहवागने मांडलं आहे. आयपीएलमध्ये अनुभवी परदेशी खेळाडूंसाठी (Foreign Players) कोट्यवधीची बोली लागते. त्यामुळे त्यांच्याकडून सतत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. धावांची भूक हे त्यांच्या अपयशाचं महत्त्वाचं कारण असल्याचं सेहवागचं मत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.