
-
ऋजुता लुकतुके
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएल विजेतेपदापासून फक्त एक विजय दूर आहे. खासकरून पहिल्या पात्रता सामन्यात त्यांनी पंजाब किंग्जचा दमदार पराभव केला आहे. आता फिरून अंतिम फेरीतही त्यांची पंजाब किंग्जशी गाठ पडणार आहे. सोशल मीडियावरही सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचीच हवा आहे. कारण, सर्वाधिक फॉलोअर्स या फ्रँचाईजीचे आहेत. अशावेळी बंगळुरूने जिंकून नये असं थेट मत इंग्लंडच्या दोन माजी फलंदाजांनी व्यक्त केलं आहे. आणि त्यासाठी त्यांची कारणं मात्र मजेशीर आहेत. (IPL 2025 Final, RCB vs PBKS)
(हेही वाचा – Veer Savarkar : महाराष्ट्र शासनाचा ‘हा’ निर्णय तर स्वातंत्र्यवीरांच्या सैनिकीकरणाच्या नीतीचाच विजय)
१७ वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिलं आयपीएल विजेतेपद पटकावलं, तर समालोचन कक्षातील त्यांचा साथीदार दिनेश कार्तिक त्यांना सहन होणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. गेल्या हंगामापर्यंत दिनेश कार्तिक बंगळुरूकडून आयपीएल खेळत होता. पण, भारतीय संघाचे सामने असताना तो क्रीडा वाहिन्यांवर समालोचन करतानाही दिसतो. समालोचकांच्या फळीत त्याच्याबरोबर नासीर हुसेन आणि मायकेल अथर्टननही दिसतात. याच दोन इंग्लिश माजी कर्णधारांना दिनेश कार्तिकच्या फ्रँचाईजीने विजेतेपद पटकावलेलं नको आहे. (IPL 2025 Final, RCB vs PBKS)
(हेही वाचा – Anna University Case : चेन्नईतील १९ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षांचा कारावास; वाचा संपूर्ण प्रकरण)
‘१७ वर्षांनंतर बंगळुरूने विजेतेपद पटकावलं, तर दिनेश कार्तिक सहन होणार नाही. मार्गदर्शक म्हणून फक्त पहिलाच हंगाम आणि त्यात त्याने ही कामगिरी केली तर तो किती माज करेल, विचार करा!’ असं स्काय स्पोर्ट्सच्या प्रसारण कार्यक्रमात बोलताना नासीर हुसेन विनोदाने म्हणाला. मायकेल आथरटननेही हुसेनची री ओढली. ‘तो जॉन टेरीसारखा आहे. तो विराटच्या बरोबरीने चषक घेऊन सगळ्यात पुढे उभा असेल. आधीच भारतीय संघ चांगली कामगिरी करत असेल तर समालोचन कक्षात तो सहन होत नाही. आता बंगळुरू फ्रँचाईजी जिंकली तर त्याचं श्रेयही दिनेशचं असेल आणि तो आम्हाला सहन होणार नाही,’ असं आथर्टन म्हणाला. दिनेश कार्तिकने गेली काही वर्ष बंगळुरू फ्रँचाईजीसाठी भरीव योगदान दिलं आहे. आताही मार्गदर्शक म्हणून तो कायम खेळाडूंबरोबर असतो आणि सीमारेषेच्या पलिकडूनही खेळाडूंना सूचना करताना दिसतो. (IPL 2025 Final, RCB vs PBKS)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community