-
ऋजुता लुकतुके
लखनौ सुपरजायंट्स संघाचा फिरकीपटू दिग्वेश राठीवर (Digvesh Rathi) अखेर आयपीएल (IPL 2025) प्रशासनाने कारवाई करताना त्याच्या मानधनातून ५० टक्के रक्कम कापण्याचे तसंच एका सामन्यासाठी त्याला निलंबित करण्याचा निर्णय दिला आहे. सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्धच लखनौला (LSG) झालेल्या सामन्यात दिग्वेशची वागणूक हा आयपीएल आचार संहितेतील तिसऱ्या श्रेणीचा गुन्हा होता, असा निर्वाळा सामनाधिकाऱ्यांनी दिला आहे. दिग्वेशशी बाचाबाची केलेल्या अभिषेक शर्मालाही (Abhishek Sharma) २५ टक्के दंडाची शिक्षा झाली आहे.
अभिषेकला त्याच्या वर्तनासाठी एक डिमेरिट गुण देण्यात आला आहे. तर दिग्वेशला ५ डिमेरिट गुण मिळाले. त्यामुळेच पुढील सामना तो खेळू शकणार नाही. लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) पुढील सामना २२ मे ला गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) होणार आहे. हा सामना आता दिग्वेश खेळू शकणार नाही. यापूर्वी पंजाब आणि मुंबई विरुद्धच्या सामन्यातही दिग्वेशवर कारवाई झाली होती.
(हेही वाचा – गर्दी नियंत्रित करण्यासाठी Western Railway चा नवा प्लॅन; ‘या’ रेल्वे स्थानकात मेट्रोप्रमाणे तिकीट अन् सुरक्षा तपासणी होणार)
Rajeev Shukla making things calm between Abhishek and Digvesh Rathi. 😄 pic.twitter.com/ukJnzWEAOu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 19, 2025
दिग्वेश सिंग बळी मिळवल्यानंतर मैदानात आक्रमकपणे आनंद साजरा करतो. त्यामुळे यापूर्वीही त्याच्यावर कारवाई झाली आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात आठव्या षटकात त्याने जोरात असलेल्या अभिषेक शर्माचा (Abhishek Sharma) बळी मिळवला. अभिषेकने तोपर्यंत २० चेंडूंत ५९ धावा केलेल्या होत्या. हा बळी लखनौसाठी महत्त्वाचा आणि सामन्यात संधी मिळवून देणारा ठरू शकला असता. त्यामुळे दिग्वेशने अभिषेकला डग आऊटची दिशा दाखवत डिवचण्याचा प्रयत्न केला.
म्हणता म्हणता दोन खेळाडूंमधील भांडण वाढलं. आणि दोघांमध्ये मैदानातच शाब्दिक खडाजंगी रंगली. सामना हैद्राबाद संघाने जिंकला. आणि तो संपल्यानंतरही दोन्ही खेळाडू एकमेकांना धारदार नजरेनं बघत होते. बीसीसीआयचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण, दोघंही ऐकत नव्हते. अखेर सामनाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली. आणि दोघांना दंड ठोठावण्यात आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community