IPL 2025, Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सने १०.७५ कोटी रुपयांच्या खेळाडूला जेव्हा पहिल्यांदाच खेळवलं…

दिल्ली विरुद्ध हैद्राबाद सामना मात्र पावसात वाहून गेला.

41
IPL 2025, Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सने १०.७५ कोटी रुपयांच्या खेळाडूला जेव्हा पहिल्यांदाच खेळवलं…
IPL 2025, Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सने १०.७५ कोटी रुपयांच्या खेळाडूला जेव्हा पहिल्यांदाच खेळवलं…
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये (IPL 2025) सोमवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद हा सामना पावसात वाहून गेला. दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित २० षटकांत ९ बाद १३३ धावा केल्यानंतर जो पाऊस सुरू झाला तो थांबलाच नाही. त्यामुळे दुसरा डाव होऊच शकला नाही. सामना रद्द होऊन दोन्ही संघांना समसमान एकेक गुण देण्यात आला. सामना रद्द होण्याची दिल्ली कॅपिटल्सची ही दुसरा खेप. महत्त्वाचं म्हणजे दिल्लीला गोलंदाजीची संधी न मिळाल्यामुळे संधातील तेज गोलंदाज टी नटराजनला गोलंदाजीची संधी मिळाली नाही. नटराजन (T. Natarajan) या हंगामातील आपला पहिला सामना खेळणार होता.

दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) अनुभवी मुकेश कुमारच्या (Mukesh Kumar) जागी त्याचा संघात समावेश केला होता. मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सनी (Delhi Capitals) नटराजनला १०.७५ कोटी रुपयांत विकत घेतलं होतं. पण, प्रत्यक्ष संघात जागा पहिल्यांदाच दिली. त्यामुळे नटराजनवर सगळ्यांचं लक्ष होतं. मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि दुश्मंत चमीराच्या (Dushmantha Chameera) साथीने नटराजनला (T. Natarajan) संघात स्थान मिळालं होतं. आणि शेवटच्या षटकांमध्ये टिच्चून गोलंदाजी करत धावा वाचवण्याची अपेक्षा त्याच्याकडून केली जात होती.

(हेही वाचा – Mithi River गाळ घोटाळा प्रकरणी मनपा अधिकारी, कंत्राटदारासह १३ जणांवर गुन्हा दाखल; ८ ठिकाणी छापे)

नटराजनने (T. Natarajan) आतापर्यंत आयपीएलमध्ये (IPL 2025) ६१ सामन्यांत ६७ बळी मिळवले आहेत. त्याची सरासरी २९ धावांची आहे. तर स्ट्राईक रेट १९ धावांचा आहे. १९ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

नटराजन (T. Natarajan) भारतीय संघातूनही खेळलेला आहे. आणि डिसेंबर २०२० मध्ये भारताकडून तो एक कसोटी सामना खेळला आहे. तसंच ४ एकदिवसीय आणि १ टी-२० सामनाही त्याच्या नावावर आहे. पण, यात त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. आणि कसोटीत त्याच्या नावावर ३ बळी आहेत. पुढे मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह  हे त्रिकुट नियमितपणे भारतीय संघात खेळायला लागल्यावर त्याला फारशी संधी मिळाली नाही. पण, आयपीएलमध्ये (IPL 2025) मात्र मागच्या दोन लिलावात त्याच्यावर संघांच्या उड्या पडल्या होत्या. आधीच्या लिलावात पंजाब किंग्जने त्याला ३ कोटी रुपये खर्चून विकत घेतलं होतं. तर यंदाही त्याच्यावर १०.७५ कोटी रुपयांपर्यंतची बोली लागली. षटकामागे फक्त ८ धावांची सरासरी त्याने राखली आहे. आणि हे त्याचं मुख्य अस्त्र आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.