- ऋजुता लुकतुके
४३ वर्षीय महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni) दीर्घ काळ क्रिकेट खेळून आपला कस आणि क्षमता यांनी लहान क्रिकेटपटूंसाठी एक उदाहरण ठेवत आहे. तसंच या पिढीसाठी तो एक क्रिकेट परंपरा माहे ठेवत आहे. शुक्रवारी सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्घचा सामना महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) ४०० वा टी-२० सामना होता. सामन्यात चेन्नईचा पराभव झाला असला तरी धोनीने या वयात क्रिकेट प्रती आपली बांधिलकी दाखवून दिल्यामुळे त्याचं कौतुक होत आहे. सुदैवाने सामना धोनीचं (MS Dhoni) घरचं मैदान चेन्नईच्या चिदंबरम स्टेडिअमवर (M. A. Chidambaram Stadium) झाला. त्यामुळे धोनीसाठी वेगळाच जल्लोष बघायला मिळत होता.
भारताकडून ४०० किंवा त्यापेक्षा जास्त टी-२० खेळलेला धोनी हा चौथा क्रिकेटपटू आहे. यापूर्वी रोहित शर्मा (४५६), दिनेश कार्तिक (४१२) आणि विराट कोहली (४०८) यांनीच ही कामगिरी केली आहे. २००७ साली टी-२० विश्वचषक जिंकून धोनीने भारतीय क्रिकेटमध्ये आपलं स्थान मिळवलं. तिथपासून ते चॅम्पियन्स करंडकातील विजेतेपद आणि एकदिवसीय विश्वचषकातील विजेतेपद अशी कामगिरी त्याने करून दाखवली आहे. तर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला सर्वाधिक ५ विजेतेपदं त्याने मिळवून दिली आहेत. (IPL 2025, CSK vs SRH)
(हेही वाचा – Fire : अंधेरीमध्ये निवासी इमारतीला आग; एकाचा मृत्यू, सहा जण रुग्णालयात दाखल)
टी-२० क्रिकेटमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्ज, रायझिंग पुणे वॉरिअर्स व झारखंड या त्याच्या स्थानिक संघांसाठी खेळला आहे. या प्रकारात १३५.९० च्या स्ट्राईक रेटने त्याने ७,५६६ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर २८ अर्धशतकं आहेत. ८४ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. तर यष्टीरक्षक म्हणून त्याने ३४ यष्टीचित आणि ३१८ झेल टिपले आहेत. एकेकाळची स्फोटक फलंदाजी आता कमी झाली असली तरी नेतृत्व गुण, खेळातील प्रगल्भता आणि यष्टीमागे चपळता हे त्याचे गुण आजही शाबूत आहेत. यंदाच्या हंगामात नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) झालेल्या दुखापतीमुळे धोनीने पुन्हा एकदा चेन्नई फ्रँचाईजीच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. पण, शेवटच्या दोन सामन्यांत संघाचा पराभव झाला आहे. आता ८ सामन्यांत त्यांचा ६ वेळा पराभव झाला आहे. गुण तालिकेत ते तळातून दुसरे आहेत. (IPL 2025, CSK vs SRH)
आणि बाद फेरी गाठण्याची एकमेव अंधुक संधी त्यांच्याकडे आहे. पण, त्यासाठी उर्वरित सर्वच्या सर्व सामने त्यांना जिंकावे लागतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community