-
ऋजुता लुकतुके
दीर्घ काळ चाललेल्या दुखापतीनंतर आयपीएलच्या माध्यमातून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीच्या नावावर आयपीएलमध्ये एक अनोखा विक्रम लागला आहे. चेन्नई विरुद्ध शमीने डावाच्या पहिल्याच चेंडूवर शेख रशीदला बाद केलं. डावाच्या पहिल्याच चेंडूवर बळी मिळवण्याची शमीची ही तब्बल चौथी वेळ होती. हाच तो अनोखा विक्रम आहे. तो एकमेव गोलंदाज आहे ज्याने चार वेळा अशी कामगिरी केली आहे. शमीच्या पूर्ण टप्प्याच्या अचूक चेंडूवर शेख रशीद ड्राईव्हचा फटका खेळायला गेला खरा. पण, फक्त बॅटची कड घेऊन चेंडू स्लिपमध्ये अभिषेक शर्माच्या हातात गेला. यापूर्वी शमीने दुबईत २०१४ मध्ये जॅक कॅलिसला पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं. त्यानंतर २०२२ मध्ये के. एल. राहुल आणि २०२३ मध्ये फील सॉल्टला बाद केलं होतं. (IPL 2025, CSK vs SRH)
(हेही वाचा – Baluchistan Attack On Pakistan Army : बलुचिस्तानात पाकिस्तानी सैनिकांवर मोठा हल्ला ; २० जणांचा जागीच मृत्यू)
हैद्राबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं. चेन्नईसाठी दोन सलामीवीर आयुष म्हात्रे आणि शेख रशीद मैदानात उतरले. आयपीएलच्या इतिहासात दोन्ही सलामीवीर २१ वर्षांच्या आतील असण्याची ही फक्त चौथी वेळ होती. संजू सॅमसन आणि रिषभ पंत, शुभमन गिल आणि टॉम बँटन, अभिषेक शर्मा आणि प्रियम गिल या जोड्या पूर्वी २१ वर्षांच्या आतील होत्या. (IPL 2025, CSK vs SRH)
(हेही वाचा – Todays Gold Rate : सोन्याच्या दरात मामुली घसरण; सोनं ९५,६६९ रुपयांवर पोहोचलं)
पण, सामन्यात खरं लक्ष वेधून घेतलं ते मोहम्मद शमी आणि हर्षल पटेल यांनी. शमीने बऱ्याच कालावधीनंतर डावाची सुरुवात केली आणि यात पहिल्याच चेंडूवर शेख रशीदला बाद केलं. दुसरीकडे आयुष म्हात्रेनं ६ चौकारांसह १९ चेंडूंत ३० धावा केल्या. चेन्नईने सॅम करन आणि रविंद्र जडेजा यांना बढती देऊन पाहिलं. पण, ही चाल यशस्वी झाली नाही आणि दोघंही अनुक्रमे ९ आणि २१ धावा करून बाद झाले. डेवाल्ड ब्रेव्हिसच्या ४२ आणि दीपक हूडाच्या २२ धावांमुळे चेन्नईने निदान दीडशेचा टप्पा ओलांडला. हैद्राबादकडून हर्षल पटेलने सर्वाधिक ४ बळी मिळवले. तर पॅट कमिन्स आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. (IPL 2025, CSK vs SRH)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community