IPL 2025 Covid 19: आयपीएलमध्ये कोव्हिड १९ चा शिरकाव, ट्रेव्हिस हेडला कोव्हिडची लागण 

54

ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये बाद फेरीच्या शर्यतीतून बाद झालेल्या सनरायझर्स हैद्राबादला आता उर्वरित सामन्यात आणखी एक धक्का बसला आहे. सलामीवीर ट्रेव्हिस हेडला कोव्हिड १९ ची बाधा झाल्यामुळे तो संघाबरोबर प्रवास करू शकणार नाही. अगदी लखनऊ सुपरजायंट्सबरोबरचा सामनाही तो खेळू शकणार नाही. तो संघाबरोबर प्रवास करत नाहीए. संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनिएल व्हिटोरी यांनी ही बातमी पत्रकारांशी बोलताना सांगितली. (IPL 2025 Covid 19)

(हेही – International Museum Day 2025: मध्य रेल्वेने आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन डिजिटल टूर्ससह केला साजरा)

पुढील सामन्यात तो खेळू शकेल अशी आम्हाला आशा आहे. त्यासाठी डॉक्टरनी त्याला परवानगी द्यायला हवी,’ असं व्हिटोरी म्हणाला. गेल्या हंगामात उपविजेता ठरलेला सनरायझर्स हैद्राबादचा संघ यंदा साखळीतच गारद झाला आहे. पण, संघातील भारतीय खेळाडूंना उर्वरित सामन्यांत चांगली कामगिरी करून भारतीय संघाचे दरवाजे ठोठावायची संधी आहे.

नितिश कुमार रेड्डी आणि ईशान किशन यांना बीसीसीआयकडून मध्यवर्ती करार तर मिळाला आहे. आता भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्यांना चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. दोघांचा समावेश भारतीय ए संघात झाला आहे. तर हैद्राबादकडून या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा अभिषेक शर्मा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावतो आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ३११ धावा केल्या आहेत. आणि हैद्राबादसाठी तो सर्वाधिक यशस्वी फलंदाज आहे. आता उर्वरित स्पर्धेत चांगली कामगिरी करून निवड समितीच्या नजरेत येण्याची आस त्याला असेल. पंजाबकडून तो नियमितपणे कसोटी संघात खेळतो.

(हेही पहा – Jammu and Kashmir मध्ये दहशतवाद्यांच्या 2 साथीदारांना अटक ; शस्त्रे, ग्रेनेड आणि ४३ काडतुसे जप्त)

सोमवारी हैद्राबादची गाठ लखनऊ सुपरजायंट्सशी पडणार आहे. तर येत्या शुक्रवारी त्यांचा सामना घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. त्यांचा शेवटचा साखळी सामना कोलकाताशी रविवारी होणार आहे. सनरायझर्स हैद्राबादचे ११ सामन्यांतून सध्या ७ गुण झाले आहेत. आणि ते गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.