
-
ऋजुता लुकतुके
यंदाच्या आयपीएलमध्ये बीसीसीआयने खेळाडूंच्या बॅट भर मैदानात तपासण्याचा सपाटा लावला आहे. आणि त्यात एकाच दिवशी दोन खेळाडूंची बॅट खेळण्यायोग्य नसल्याची घटना मंगळवारी समोर आली. कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) फलंदाज सुनील नरेन (Sunil Narine) आणि एनरिच नॉर्खिया (Anrich Nortje) यांच्या बॅट, बॅटगेजमधून पार झाल्या नाहीत. त्यामुळे दोघांनाही पंचांनी बॅट बदलून आणण्यास सांगितलं. या हंगामात हा प्रकार पहिल्यांदाच घडला. या आधी घेतलेल्या सर्व चाचण्यांमध्ये फलंदाज उत्तीर्ण झाले होते. अर्थात, बॅटचा आकार नियमांत बसणारा नसला तर कुठलीही कारवाई होत नाही. फक्त फलंदाजांना बॅट बदलावी लागते. (IPL 2025, Bat Check)
सोमवारी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) फलंदाज हार्दिक पंड्याची (Hardik Pandya) बॅट अशाप्रकारे पंचांनी खेळ थांबवून तपासली, तेव्हा सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा झाली होती. त्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी दोन फलंदाज या जाळ्यात अडकले आहेत. कोलकाता संघाला पंजाबच्या १११ धावांचा पाठलाग करायचा होता. आणि कोलकाताचा संघ आपला डाव सुरू करणार, इतक्यात राखीव पंच सय्यद खलीद यांनी नरेनची बॅट तपासणीसाठी मागितली. खरंतर दोन्ही सलामीवीरांची बॅट तपासली गेली. पण, अंगक्रिश रघुवंशीची (Angkrish Raghuvanshi) बॅट बॅटगेजमधून सुरक्षित पार झाली. तर नरेनची मध्येच फसली. त्यामुळे त्याला बॅट बदलावी लागली. हा प्रसंगही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (IPL 2025, Bat Check)
(हेही वाचा – Brahmos Deal : चीनसाठी धोक्याची घंटा ! भारताचे ‘ब्रह्मोस’ ठरणार ‘या’ देशांसाठी सुरक्षा कवच ; 700 मिलियन डॉलरची डील)
#ICYMI: Sunil Narine’s bat failed the gauge test against Punjab Kings.
Earlier, gauge tests used to be conducted in the dressing room, but recently in the IPL, umpires have started doing them on the field.
A bat must follow the rules – face width under 10.79 cm, blade thickness… pic.twitter.com/r0mkp4P0ZU
— CricTracker (@Cricketracker) April 16, 2025
(हेही वाचा – आप नेते Durgesh Pathak यांच्या घरावर CBI चा छापा !)
सुरुवातीला बसलेल्या या धक्क्याने असेल कदाचित सुनील नरेन (Sunil Narine) ५ धावा करून लगेचच बाद झाला. कोलकाताचा डाव ९ बाद ९५ धावांवर असताना अकरावा फलंदाज म्हणून एनरिच नॉर्खिया (Anrich Nortje) मैदानात उतरला. संघाला तेव्हा आणखी १६ धावा विजयासाठी हव्या होत्या. त्याचीही बॅट तपासण्यात आली. आणि ती बॅटगेज चाचणीत नापास झाल्यामुळे नॉर्खियालाही बॅट बदलावी लागली. तो नॉन-स्ट्राईकर एंडलाच राहिला. पुढच्याच चेंडूवर आंद्रे रसेल (Andre Russell) बाद झाल्यामुळे नॉर्खियाला (Anrich Nortje) नवीन बॅट घेऊन खेळण्याची संधीच मिळाली नाही. (IPL 2025, Bat Check)
भर मैदानात बॅट तपासण्याच्या या कृतीबद्दल आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी आपलं मौन सोडलं आहे. ‘खेळात कुणालाही अवाजवी फायदा मिळता कामा नये. खेळातील परिस्थिती सगळ्यांसाठी सारखी असायला हवी. यासाठी आयपीएल (IPL 2025) प्रशासनाने हे पाऊल उचललं आहे. आणि इथून पुढेही मैदानातील चाचण्या सुरू राहतील,’ असं धुमाळ मीडियाशी बोलताना म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community