-
ऋजुता लुकतुके
दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) भेटल्यावर आजही युवा क्रिकेटपटूंना क्रिकेटचा देव भेटल्याचा आनंद मिळतो. चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) १७ वर्षीय सलामीवीर आयुष म्हात्रेसाठीही (Ayush Mhatre) तो क्षण काही वेगळा नव्हता. या भेटीची क्षणचित्रं त्याने सोशल मीडियावर शेअर केली बरोबर सचिनने त्याला दिलेला मंत्रही त्याने लिहिला आहे. ‘तुझा खेळ करत राहा. आणि तुझ्यासारखाच राहा, बदलू नकोस,’ असं सचिन म्हणाल्याचं आयुषने लिहिलं आहे.
आयुषने हा सचिनला भेटल्याचा प्रसंग चेन्नई फ्रँचाईजीच्या एका पॉडकास्टमध्ये तशाच्या तसा सांगितला आहे. चेन्नई आणि राजस्थान दरम्यानच्या सामन्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. सचिनला भेटण्याचा अनुभव कसा होता, असा प्रश्न विचारताच, आयुषच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटलं. पुढे तो म्हणाला, ‘तो अनुभव मी विसरू शकणार नाही. मी त्याविषयी बोलूही शकणार नाही. पण, सचिन म्हणाले की, तुझ्यासारखाच खेळ. आणि बदलू नकोस!’
(हेही वाचा – मुंबई ठरतेय भारताची Start Up ची राजधानी’; जाणून घ्या किती झाली गुंतवणूक)
⏪Unexplainable feeling Ft. Ayush! 💛✨#WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/w2gYXqyiw3
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 20, 2025
या मुलाखतीपूर्वी आयुषने आपल्या इन्स्टाग्रामवर सचिन तेंडुलकरबरोबरचा (Sachin Tendulkar) एक फोटो टाकला होता. ‘काही प्रसंग शब्दांत सांगता येत नाहीत. क्रिकेटच्या देवाला भेटण्याचा अनुभव हा असाच दैवी होता,’ असं तेव्हा आयुषने लिहिलं होतं. त्यावरूनच त्याला हा प्रश्न विचारण्यात आला. मेगा लिलावात आयुष म्हात्रेवर (Ayush Mhatre) बोली लागली नव्हती. पण, चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) जायबंदी झाल्यावर त्याची संघात वर्णी लागली.
(हेही वाचा – Uttar Pradesh मधील विद्यापीठात बनावट पदव्यांचा गोरखधंदा, ‘४-४ लाखांत…’; एसटीएफच्या तपासात धक्कादायक माहिती समोर)
View this post on Instagram
त्यानंतर ५ सामन्यांत त्याने ३३ धावांच्या सरासरीने १६३ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईकरेट १८३ धावांचा तगडा आहे. खासकरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्धच्या ९४ धावांसाठी तो ओळखला जातो. आयुषच्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही चेन्नईचा संघ यंदा गुणतालिकेत तळाला आहे. राजस्थान विरुद्धही आयुषने ४३ धावा केल्या. पण, त्यांनी समोर ठेवलेली १८७ ही धावसंख्या राजस्थान रॉयल्सनी (Rajasthan Royals) ६ गडी राखून पार केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community