IPL 2025 : अभिषेक आणि दिग्वेश यांच्यात भर मैदानातच झालं भांडण; ‘केस पकडून मारेन,’ असं अभिषेक का म्हणाला?

IPL 2025 : दिग्वेशचा बळी मिळवल्याचा आनंद साजरा करणं वादग्रस्त ठरत आहे.

44
IPL 2025 : अभिषेक आणि दिग्वेश यांच्यात भर मैदानातच झालं भांडण; ‘केस पकडून मारेन,’ असं अभिषेक का म्हणाला?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या लखनौमधील सामन्यात पुन्हा एकदा एक मैदानावरच एक भांडण पाहायला मिळालं. डावातील आठव्या षटकात फिरकीपटू दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मा यांच्यात भर मैदानात जुंपली. अभिषेक शर्माने २० चेंडूंत ५९ धावा केल्यावर दिग्वेशने त्याला बाद केलं आणि तिथेच वादाला सुरुवात झाली. दिग्वेश राठीचं बळी मिळवल्यावर आनंद साजरा करतानाचं वर्तन अनेकांना रुचलेलं नाही. त्यावरून मैदानावर यापूर्वीही वाद झालेले आहेत. त्याला समज दिल्यानंतर त्याने आपली पद्धत थोडी बदलली. पण, आता सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध पुन्हा तो वादाच्या केंद्रस्थानी आहे. (IPL 2025)

(हेही वाचा – “भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू हरपला” ; Dr. Jayant Narlikar यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली)

दिग्वेशचा गुगली चेंडू ऑफच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न अभिषेकने केला. पण, चेंडू बॅटची कड घेऊन स्विपर कव्हरला उडाला. तिथे शार्दूल ठाकरने धावत जाऊन झेल पकडला. लखनौच्या गोटात आनंद पसरला खरा. पण, या आनंदाने लवकरच वेगळं वळण घेतलं. दिग्वेशने केलेल्या हावभावांनंतर अभिषेक त्याच्यावर चाल करून गेला. दोघांमध्ये भांडण सुरू झालं. पंच आणि दोन्ही बाजूच्या खेळाडूंनी मध्ये पडून ते मिटवलं. पण, दोघंही चिडलेले दिसत होते. (IPL 2025)

(हेही वाचा – भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळांना परराष्ट्र सचिव Vikram Mistry वस्तुस्थिती सांगणार !)

लखनौ संघाने समोर ठेवलेलं २०५ धावांचं आव्हान हैद्राबादने लिलया पेललं. अभिषेक शर्मानेच घणाघाती सुरुवात संघाला करुन दिली. तो नवव्या षटकात बाद झाला तेव्हा संघाची अवस्था १ बाद ९९ झाली. तो बाद झाल्यानंतरही ईशान किशन (३५), हेनरिक क्लासेन (४७) आणि कामिंदू मेंडिस (३२) यांनी हैद्राबादला विजय मिळवून दिला. त्यापूर्वी मिचेल मार्श आणि एडन मार्करम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौने ७ बाद २०५ धावा केल्या होत्या. कर्णधार रिषभ पंत मात्र पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो ७ धावांवरच बाद झाला. या पराभवामुळे लखनौ सुपरजायंट्स संघासमोरचं बाद फेरीचं आव्हान दुरापास्त झालं आहे. १२ सामन्यांत १० गुणांसह ते आता सातव्या क्रमांकावर आहेत आणि उर्वरित दोन सामन्यांतून ४ गुण जरी मिळवले तरी ते बाद फेरी गाठू शकणार नाहीत. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.