-
ऋजुता लुकतुके
आंतरराष्ट्रीय व्यस्त क्रिकेट कार्यक्रमाचा खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर काय परिणाम होतो हे दाखवणारा अपडेट आयपीएलमधून आला आहे. सततच्या क्रिकेटमुळे आयपीएलच्या शेवटच्या ८ दिवसांत ८ खेळाडूंना दुखापत झाली असून त्यांना स्पर्धाही अर्धवट सोडावी लागली आहे. स्पर्धेच्या नियमानुसार, बदली खेळाडू निवडणं हे फ्रँचाईजींसमोरचं आव्हान ठरत आहे. सध्या आठही खेळाडूंसाठी बदली खेळाडू निवडण्यात आले आहेत. (IPL 2025)
मागच्या दोन दिवसांत उर्विल पटेल, मयंक अगरवाल आणि नांद्रे बर्गर यांचा आयपीएलमध्ये समावेश झाला आहे. साखळीचे अजून १३ सामने बाकी आहेत. दुखापतींची संख्या वाढताना दिसत आहे. ‘आता जे बदली खेळाडू संघात येत आहेत, हा फ्रँचाईजींसाठी फायद्याचं ठरत आहे. कारण, लिलावात बोली न लागलेले खेळाडू त्यांच्या मूलभूत किमतीवर खरेदी करता येत आहेत,’ असं दोडा गणेश या माजी भारतीय खेळाडूने म्हटलं आहे. एकंदरीत या हंगामात एकूण १७ बदली खेळाडूंना हंगाम सुरू झाल्यानंतर विविध संघांमध्ये स्थान मिळालं आहे. चेन्नई, हैद्राबाद आणि मुंबई हे संघ यात आघाडीवर आहेत. या १७ खेळाडूंची यादी बघूया, (IPL 2025)
(हेही वाचा – India Pakistan War : पाकड्यांच्या कुरापती सुरूच; चंदीगडमध्ये वाजले आपत्कालीन सायरन)
मुंबई इंडियन्स
मुजिब उर रेहमान – अल्लाह गझनफर
कॉर्बिन बॉश – लिझाड विल्यम्स
रघू शर्मा – विघ्नेश पुथूर
चेन्नई सुपरकिंग्ज
आयुष म्हात्रे – ऋतुराज गायकवाड
डेवाल्ड ब्रेव्हिस – गुरजपनीत सिंग
उर्विल पटेल – वंश बेदी
सनरायझर्स हैद्राबाद
हर्ष दुबे – स्मरण रवीचंद्रन
स्मरण रवींचंद्रन – ॲडम झंपा
वियान मल्डर – ब्रायडन कार्स
गुजरात टायटन्स
दसून शनाका – ग्लेन फिलीप्स (IPL 2025)
(हेही वाचा – भारत-पाकिस्तान तणावामुळे CA ची मुख्य परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली!)
दिल्ली कॅपिटल्स
सदिकुल्ला अटल – हॅरी ब्रूक
कोलकाता नाईट रायडर्स
चेतन सकारिया – उमरान मलिक
पंजाब किंग्ज
मिच ओवेन – ग्लेन मॅक्सवेल
राजस्थान रॉयल्स
ल्युहान दे प्रिटोरिअस – नितिश राणा
नांद्रे बर्गर – संदीप शर्मा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
मयंक अगरवाल – देवदत्त पड्डिकल (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community