IPL 2025 : आयपीएलमध्ये बाद फेरीची संधी कुणा कुणाला? मुंबई, दिल्लीत जोरदार चुरस

IPL 2025 : बंगळुरू, गुजरात आणि पंजाब यांना हवाय फक्त एक विजय.

58
IPL 2025 : आयपीएलमध्ये बाद फेरीची संधी कुणा कुणाला? मुंबई, दिल्लीत जोरदार चुरस
  • ऋजुता लुकतुके

एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर आयपीएलचा अठरावा हंगाम शनिवारी पुन्हा सुरू होतोय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्थगित करण्यात आली होती. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यानं तणाव कमी झाल्याने आयपीएल पुन्हा १७ मे पासून सुरु करण्यात येणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार, आयपीएच्या १८ व्या हंगामाची अंतिम फेरीची लढत नव्या वेळापत्रकानुसार ३ जूनला होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे तीन संघ फ्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत. आता राहिलेल्या ७ संघांमध्ये प्लेऑफची शर्यत आहे. गुणतालिकेत पहिल्या चार स्थानांवर असलेल्या संघांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल. (IPL 2025)

गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, पंजाब किंग्ज हे तीन संघ आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.तर, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चौथ्या स्थानासाठी शर्यत आहे. यापैकी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये तगडी स्पर्धा आहे. (IPL 2025)

(हेही वाचा – महाराष्ट्राच्या Chief Secretary Post साठी ‘शर्यत रंगली’; भूषण गगराणी आघाडीवर, चहल-राजेश यांच्यात जोरदार स्पर्धा)

गुजरात टायटन्स : शुभमन गिलच्या नेतृत्त्वात गुजरात टायटन्सने ११ पैकी ८ सामने जिंकले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर, गुजरात टायटन्सकडे १६ गुण आहेत. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना तीन पैकी किमान एक सामना जिंकावा लागेल. जर संघाने राहिलेल्या तीन पैकी दोन सामन्यांत विजय मिळवला तर ते अव्वल दोन संघांत स्थान मिळवतील. (IPL 2025)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : आरसीबी आणि केकेआर यांच्यात १७ मे रोजी सामना होणार आहे. आरसीबीकडे केकेआरला पराभूत करत बाद फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ होण्याची संधी शक्यता आहे. आरसीबीनं ११ सामन्यात १६ गुण मिळवले आहेत. (IPL 2025)

पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जने ११ पैकी ७ सामने जिंकले आहेत. त्यांच्याकडे १५ गुण आहेत. कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द झाला आहे. तर, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना पुन्हा होणार आहे. पंजाबला राहिलेल्या तीन पैकी किमान २ सामने जिंकावे लागतील. (IPL 2025)

(हेही वाचा – ‘बाल वाड्ःमय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची खोचक प्रतिक्रिया)

मुंबई इंडियन्स : मुंबई इंडियन्सनी १२ सामन्यात १४ गुण मिळवले आहेत. मुंबईचा नेट रन रेट (+१.१५६) इतका तगडा आहे. मुंबईला पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध विजय मिळवावा लागेल. मुंबईचा एका सामन्यात जरी पराभव झाला तरी दिल्ली कॅपिटल्सला त्याचा फायदा होऊ शकतो. (IPL 2025)

दिल्ली कॅपिटल्स : दिल्ली कॅपिटल्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये दणक्यात सुरुवात केली होती. मात्र, मुंबई विरुद्ध पराभव झाल्यानंतर त्यांची लय बिघडली. आता त्यांच्याकडे तीन सामने जिंकत १९ गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. दिल्लीनं दोन सामने जिंकले तर मुंबईचा एका सामन्यात पराभव झाल्यास त्यांना बाद फेरीचं तिकीट मिळेल. (IPL 2025)

लखनौ सुपर जायंटस : रिषभ पंतची लखनौ सुपर जायंटस अजूनही बाद फेरीच्या शर्यतीत आहे. त्यांच्याकडे १६ गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. एक जरी पराभव झाला तर ते स्पर्धेबाहेर जाऊ शकतात. लखनौने ११ सामन्यात १० गुण मिळवले आहेत. लखनौचे पुढील सामने आरसीबी, गुजरात आणि सनरायडर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहेत. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.