IPL 2024 : आयपीएलचा हंगाम भारतात होणार

सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला की, आयपीएलच्या तारखाही जाहीर होतील, असं स्पर्धेचे संचालक धुमाळ यांनी सांगितलं आहे. 

196
IPL 2024, Hardik Pandya: मुंबई संघात दोन तट? हार्दिकच्या ट्रोलिंगवर संघात चर्चा
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल स्पर्धा भारतातच भरवण्यावर सध्या तरी बीसीसीआय ठाम आहे. त्यासाठी सरकारबरोबर बोलणी सुरू असल्याचंही आयपीएलचे संचालक अरुण धुमाळ यांनी स्पष्ट केलं आहे. स्पर्धेचं अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी केंद्रसरकार, पोलीस दल आणि इतर संबंधित यंत्रणांशी चर्चा करू असं धुमाळ यांनी म्हटलंय. (IPL 2024)

‘आम्ही केंद्र सरकार आणि इतर संबंधित यंत्रणांशी संपर्कात आहोत. आणि स्पर्धा भारतातच घेण्याची परवानगी आम्हाला त्यांच्याकडून मिळेल अशी आम्हाला आशा आहे. एकदा का सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या की, आम्ही संगनमताने आयपीएलच्या तारखाही जाहीर करू,’ असं धुमाळ आयएनएसए या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. (IPL 2024)

(हेही वाचा – ICC Test Ranking : जसप्रीत बुमरा कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम)

राऊंड-रॉबिन पद्धतीने सामने झाल्यास एकूण इतके सामने खेळवावे लागतील

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएल स्पर्धा सुरू होईल. आणि निवडणुका एप्रिलमध्ये आहेत. आणि निवडणुकांचे टप्पे असल्यामुळे स्पर्धा सुरळीतपणे घेणं शक्य होईल, असा बीसीसीआयचा होरा आहे. (IPL 2024)

आयपीएलमध्ये एकूण १० संघ आहेत. आणि राऊंड-रॉबिन पद्धतीने साखळी सामने झाल्यास एकूण ७४ सामने खेळवावे लागतील. त्यामुळे निवडणुकीचा अंदाज घेता कदाचित दोन टप्प्यांमध्ये आयपीएल घ्यावी लागेल असा अंदाज आहे. पहिला टप्पा निवडणुकी पूर्वी आणि दुसरा निवडणुकीनंतर असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. पण, अजून तरी स्पर्धा बाहेर देशात घेण्याविषयी बीसीसीआयने कुठलीही हालचाल केलेली दिसत नाही. (IPL 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.