IPL 2024 : टाटा सन्सच पुढील पाच वर्षांसाठी आयपीएलचे टायटल प्रायोजक

आयपीएल प्रायोजकत्वाच्या लढाईत टाटा सन्सनी आदित्य बिर्ला समुहाला मागे टाकल्याचं समजतंय.

141
Fastest Balls in IPL : उमरान मलिक की शॉन टेट? आयपीएलमधील सगळ्यात वेगवान गोलंदाज कुठला?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या प्रायोजकत्वाचा खेळ २०२४ मध्ये आणखी मोठा झाला आहे. २०२४ ते २०२८ या पुढील पाच वर्षांच्या आयपीएल स्पर्धांसाठी टाटा समुहाने ५०० कोटी रुपये प्रत्येक हंगामासाठी देऊ केले आहेत. आणि त्यामुळे टायटल प्राजोकत्व आणखी पाच हंगामांसाठी त्यांच्याकडेच राहील, असं खात्रीलायकरित्या समजतंय. टाईम्स वृत्तपत्र समुहाने याविषयीची बातमी दिली आहे. (IPL 2024)

बीसीसीआयने प्रायोजकत्वासाठी निविदा मागवल्या तेव्हा आदित्य बिर्ला समुह त्यासाठी उत्सुक होता. आणि त्यांनी प्रत्येक हंगामासाठी ५०० कोटी रुपयांची बोली लावल्याचं बोललं जात होतं. २०२३ त्या हंगामापर्यंत मुख्य प्रायोजक टाटा समुह होता. (IPL 2024)

आणि बीसीसीआयच्या नियमांनुसार, आधीच्या प्रायोजकाला एक नकाराधिकार देण्यात आला आहे. नवीन होऊ घातलेला करार त्यांच्या इतकीच बोली लावून ते नाकारू शकतात. म्हणजे नवीन हंगामात लागलेल्या सर्वोत्तम बोली इतके पैसे आधीच्या प्रायोजकांनी देण्याची तयारी दर्शवली तर तेच प्रायोजक म्हणून कायम राहतात. (IPL 2024)

(हेही वाचा – Indian Army : भारत-पाक युद्धात महापराक्रम गाजवलेला ‘रणगाडा’ कुडाळात दाखल)

इथं टाटा सन्स समुहाने २०२४-२८ हंगामासाठी ५०० कोटी प्रत्येक हंगामासाठी देण्याची तयारी दर्शवल्याचं टाईम्सनं म्हटलं आहे. म्हणजे पाच हंगामांसाठी ते २,५०० कोटी रुपये मोजणार आहेत. २०२५ पासून आयपीएल स्पर्धाही आणखी मोठी होणार आहे. २०२४ मध्ये ७४ सामने होणार आहेत. तर २०२५ मध्ये ही संख्या ८४ आणि २०२६ मध्ये ती ९४ वर नेण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. (IPL 2024)

आधीच्या २०२२-२४ साठीचा टाटा समुह आणि बीसीसीआयमधील करार हा ६७० कोटी रुपयांचा होता. (IPL 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.