IPL 2024, SRH vs GT : गुजरात टायटन्सची हैदराबादवर ७ गडी राखून मात

IPL 2024, SRH vs GT : मुंबई विरुद्ध २७७ धावा करणारा सनरायझर्सचा संघ गुजरात विरुद्ध १६२ धावांत ढेपाळला

107
IPL 2024, SRH vs GT : गुजरात टायटन्सची हैदराबादवर ७ गडी राखून मात
IPL 2024, SRH vs GT : गुजरात टायटन्सची हैदराबादवर ७ गडी राखून मात
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या सामन्यांची रंगत पहिल्या टप्प्यातच वाढू लागली आहे. गुण तालिकेत प्रत्येक सामन्यागणिक बदल होत आहेत. आयपीएल २०२४ चा १२ वा सामना हा गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (IPL 2024, SRH vs GT) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरात टायटन्सने हैदराबादवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला आहे. (IPL 2024, SRH vs GT)

(हेही वाचा- IPL 2024, CSK vs DC : दिल्लीविरुद्धच्या पराभवामुळे चेन्नई सुपरकिंग्जचं मोठं नुकसान )

या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि गुजरातला प्रथम गोलंदाजीचे आव्हान दिले. सनरायजर्स हैदराबादकडून फलंदाजी करताना मयांक अग्रवालने १६, ट्रेव्हिस हेडने १९, अभिषेक शर्माने २९, एडन मार्करमने १७, हेन्रीचं क्लासेनने २४, शाहबाद अहमदने २२ तर पॅट कमिन्सने २ धावा केल्या. (IPL 2024, SRH vs GT)

(हेही वाचा- Toll Rates : वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोल शुल्कात १८ टक्क्यांनी वाढ, ‘हे’ आहेत सुधारित दर)

हैदराबाद संघाला २० षटकांत ८ गडी गमावत १६३ धावा करण्यात यश आले. हैदराबादच्या संघाने २० षटकांत ८ गडी गमावत १६२ धावा केल्या होत्या. गुजरातसमोर १६३ धावांचं आव्हान होतं. गुजरातकडून सर्वाधिक 3 बळी मोहित शर्माने घेतले. तर राशिद खान, उमेश यादव, नूर अहमद आणि ओमरझयीने प्रत्येकी एक गडी बाद केला.. (IPL 2024, SRH vs GT)

(हेही वाचा- Electricity Rate Hike: वाढत्या तापमानाचा सर्वसामान्यांना फटका, महावितरणचे नवे दर लागू)

गुजरात टायटन्सकडून विजयाचे आव्हान पूर्ण करताना फलंदाजांपैकी शुभमन गिलने (Shubman Gill) ३६, रिद्धिमान साहाने २५, साई सुदर्शनने ४५, डेव्हिड मिलरने ४४, विजय शंकरने १४ धावांची खेळी केली. सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांपैकी पॅट कमिन्स, शाबाझ अहमद आणि मयंक मार्कंडे यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश आलं. गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी विसाव्या षटकात ५ चेंडू राखून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. (IPL 2024, SRH vs GT)

हेही पहा- 

https://www.youtube.com/watch?v=Wo3ltKp5sTw&t=731s

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.