IPL 2024 MI vs SRH : सनरायझर्स हैद्राबादच्या मालक काव्या मारन यांची प्रतिक्रिया ‘मी जगातील सगळ्यात आनंदी व्यक्ती’

IPL 2024 MI vs SRH : काव्या मारन सामना बघण्यासाठी स्टेडिअमवर उपस्थित होत्या. 

214
IPL 2024 MI vs SRH : सनरायझर्स हैद्राबादच्या मालक काव्या मारन यांची प्रतिक्रिया ‘मी जगातील सगळ्यात आनंदी व्यक्ती’
  • ऋजुता लुकतुके

बुधवारचा दिवस सनरायझर्स हैद्राबाद फ्रँचाईजीच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा दिवस होता. मुंबई इंडियन्सचा त्यांनी ३० धावांनी पराभव केला हे एक समाधान. पण, त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या फलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ३ बाद २७७ नोंदवली. ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिच क्लासेन यांच्या अंगात काय संचारलं होतं हे त्यांनाच माहीत. २५० च्या स्टाईकरेटनी त्यांनी धावा कुटल्या. आणि अखेर हा धावांचा डोंगर उभा राहिला. (IPL 2024 MI vs SRH)

हा सामना सुरू असताना सनरायझर्स फ्रँचाईजीच्या मालक काव्या मारन टीव्हीवर सातत्याने दाखवल्या जात होत्या. संघाचा संग असलेला केशरी रंगाचा कोट आणि त्यावर संघाचा लोगो त्यांनी परिधान केला होता. आणि प्रत्येक षटकारावर त्या जल्लोष साजरा करत होत्या. (IPL 2024 MI vs SRH)

ते पाहून एका चाहत्याने ट्विटरवर लिहिलंही, ‘काव्या मारन जगातील सगळ्यात खुश व्यक्ती असतील आज.’ (IPL 2024 MI vs SRH)

(हेही वाचा – Mumbai Digital Board : मुंबईत झळकणार ४०० डिजिटल जाहिरात फलक, महापालिकेच्या तिजोरीत महिन्याला वाढणार अडीच कोटींचा महसूल)

काव्या दिसतही होत्या तशाच. सामना संपल्यानंतरही त्यांनी बराच वेळ खेळाडूंबरोबर ड्रेसिंग रुममध्येही घालवला. घरच्या मैदानावर महत्त्वपूर्ण विजय मिळवताना सनरायझर्स हैद्राबाद संघाने गुणतालिकेतही आता तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिच क्लासेन यांनी बुधवारी मैदानावर कमाल केली. होडने २४ चेंडूंत ६३, अभिषेक वर्माने २३ चेंडूंत ६४ आणि क्लासेनने तर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत ३९ चेंडूंत ८० धावा केल्या. त्यामुळे हैद्राबादचा संघ ३ बाद २७७ अशी धावसंख्या उभारू शकला. (IPL 2024 MI vs SRH)

हैद्राबादचा धडाकाच असा होता की, ७व्या षटकांत त्यांच्या १०० धावा फलकावर लागल्या. आणि १४ व्या षटकांत २०० धावा झालेल्या होत्या. मुंबई संघाचा मात्र हा सलग दुसरा पराभव होता. आणि हार्दिक पांड्याचं ट्रोलिंग आणखी वाढलंय. (IPL 2024 MI vs SRH)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.