इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सात्त्विक-चिरागचे ऐतिहासिक यश

‘सुपर १०००’ दर्जा प्राप्त स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली आहे.

112
इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सात्त्विक-चिरागचे ऐतिहासिक यश

रविवार १८ जून रोजी इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धेत भारताला ऐतिहासिक यश मिळाले आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या विजेत्यापदावर भारताने आपले नाव कोरले आहे. सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीच्या पदरी हे यश पडले आहे. ‘सुपर १०००’ दर्जा प्राप्त स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली आहे.

जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सात्त्विक-चिराग जोडीने अंतिम सामन्यात मलेशियाच्या आरोन चिया व सोह वूई यिक या जागतिक विजेत्या जोडीला २१-१७, २१-१८ असे सरळ गेममध्ये पराभूत करत प्रथमच ‘सुपर १०००’ दर्जा असणारी स्पर्धा जिंकली. दोन्ही जोडय़ांमध्ये सामन्याच्या सुरुवातीपासूनच चांगली चुरस पाहायला मिळाली. सात्त्विक-चिराग जोडीने पहिल्या गेममध्ये ११-९ अशी आघाडी घेतली आणि आपल्या कामगिरीत सातत्य राखताना पहिला गेम २१-१७ असा जिंकला.

(हेही वाचा – इतिहासात प्रथमच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन होणार)

इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद मिळवणारी सात्त्विक-चिराग पहिली भारतीय जोडी ठरली. यापूर्वी, सायना नेहवाल (२०१० व २०१२) आणि किदम्बी श्रीकांत (२०१७) यांनी एकेरीत जेतेपद मिळवले होते. तर सात्त्विक-चिराग जोडीने सुपर १००, सुपर ३००, सुपर ५००, सुपर ७५० आणि सुपर १००० दर्जा असणाऱ्या स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय जोडी बनण्याचा मान मिळवला.

सात्त्विक -चिराग जोडीने तब्बल ८२.३५ टक्के अंतिम सामने जिंकले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.