Indo – Pak Sports War : नदीम अर्शदने नीरज चोप्राचं भालाफेक स्पर्धेचं निमंत्रण का नाकारलं?

Indo - Pak Sports War : पॅरिस ऑलिम्पिक विजेत्या अर्शदने भारतात यायला नकार दिला आहे. 

117
Indo - Pak Sports War : नदीम अर्शदने नीरज चोप्राचं भालाफेक स्पर्धेचं निमंत्रण का नाकारलं?
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू अर्शद नदीमने भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दिलेलं भारतात खेळण्याचं निमंत्रण विनम्रपणे नाकारलं आहे. नीरज चोप्राने भारतात बंगळुरू इथं येत्या २४ मे रोजी एनसी क्लासिक नावाने एका स्पर्धेचं आयोजन केलं आहे. पण, त्याच दरम्यान आशियाई विजेतेपदाच्या कोरियातील स्पर्धेसाठी सराव करायचा आहे, असं कारण देत अर्शदने नीरज चोप्राचं हे आमंत्रण नाकारलं आहे. ‘२२ मे ला मला कोरियाला जायचं आहे आणि ही स्पर्धा २४ तारखेला आहे. त्यामुळे भारतातील स्पर्धेत मी भाग घेऊ शकत नाही,’ असं म्हटल्याचं पीटीआय या वृत्तसंस्थेनं नमूद केलं आहे. (Indo – Pak Sports War)

(हेही वाचा – IPL 2025, RCB vs RR : अखेर घरच्या मैदानावर बंगळुरूचं नशीब पालटलं, रंगतदार सामन्यात राजस्थानचा ११ धावांनी पराभव)

२७ ते ३१ मे दरम्यान कोरियातील गुमी इथं आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी सराव करण्यावर नदीमने भर दिला आहे. पण, नीरज चोप्राने नदीम अर्शदला स्पर्धेसाठी आमंत्रण दिलं होतं. ‘मी नदीमलाही आमंत्रण दिलं आहे आणि आपल्या प्रशिक्षकांशी चर्चा करून नदीम मला कळवणार आहे. सध्या तरी त्याच्याकडून उत्तर आलेलं नाही,’ असं नीरज चोप्रा सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाला होता. गेल्यावर्षी जून महिन्यात पॅरिस इथं झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नदीम अर्शदने ९२.९७ मीटरची भालाफेक करून सुवर्ण जिंकलं होतं. तर नीरज चोप्राने ८९.४५ मीटरच्या फेकीसह रौप्य आपल्या नावावर केलं. त्यापूर्वी टोकयोमध्ये नीरजने सुवर्ण जिंकलं होतं. (Indo – Pak Sports War)

(हेही वाचा – बेजबाबदार विधाने करू नका; वीर सावरकर अवमानप्रकरणी Rahul Gandhi यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले)

नीरज चोप्रा पुढील महिन्यात भारतात एनसी क्लासिक या नावाने भालाफेकीची स्पर्धा भरवत आहे. आतापर्यंत ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स (२ वेळा विश्वविजेता), जर्मनीचा थॉमस रोहलर (२०१६ ऑलिम्पिक विजेता) तसंच केनियाचा ज्युलिअस येगो आणि अमेरिकेचा कर्टिस थॉमसन यांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. नीरज चोप्रा आणि जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स यांनी एकत्र येऊन या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. तर भारतीय ॲथलेटिक्स असोसिएशनन आणि जागतिक असोसिएशननेही स्पर्धेला मान्यता दिली आहे. जागतिक फेडरेशनने स्पर्धेला ए रेटिंग दिलं आहे. जगभरातील नावाजलेल्या भालाफेकपटूंचा खेळ भारतीयांना पाहता यावा यासाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. (Indo – Pak Sports War)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.