Indo – Pak Cricket : आशिया क्रिकेट परिषदेतून माघार घेणार नाही; बीसीसीआय सचिव यांचे वक्तव्य

पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी बीसीसीआयची खेळी असल्याची चर्चा होती.

78
Indo - Pak Cricket : आशिया क्रिकेट परिषदेतून माघार घेणार नाही; बीसीसीआय सचिव यांचे वक्तव्य
Indo - Pak Cricket : आशिया क्रिकेट परिषदेतून माघार घेणार नाही; बीसीसीआय सचिव यांचे वक्तव्य
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव क्रिकेटच्या मैदानात खूप लवकर पोहोचतो. आताही भारत आणि पाकिस्तान दरम्यान ४ दिवस झालेल्या धुमश्चक्रीनंतर उभय देशांमधील क्रिकेट मालिका हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात आशिया चषक (Asia Cup) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होणार आहे. आणि यंदा ही स्पर्धा भारतात होणार आहे. अशावेळी भारत पाकिस्तान दरम्यानच्या तणावामुळे भारत पाकिस्तानला एकटा पाडण्यासाठी आशिया क्रिकेट परिषदेतून माघार घेईल अशी जोरदार चर्चा रविवार आणि सोमवारी रंगली होती. पण, बीसीसीआयचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया (Devajit Saikia) यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. (Indo – Pak Cricket)

‘सकाळपासून काही बातम्या आमच्या कानावर आल्या आहेत. आशिया क्रिकेट परिषद आयोजित करत असलेल्या स्पर्धेतून भारतीय संघ माघार घेईल अशी चर्चा सुरू आहे. पण, यात काहीही तथ्य नाही,’ असं सैकिया यांनी पीटीआयशी बोलताना सोमवारी रात्री स्पष्ट केलं आहे. बीसीसीआयने (BCCI) या मुद्यावर अजून चर्चाही केलेली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ‘बीसीसीआयचं सगळं लक्ष सध्या सुरू असलेली आयपीएल (IPL) आणि त्यानंतरचा इंग्लंड दौरा यावरच आहे. आशिया परिषदेला आम्ही काहीही लेखी कळवलेलं नाही,’ असं सैकिया यावर म्हणाले.

(हेही वाचा – Chhagan Bhujbal : भुजबळांची मंत्रिमंडळात एन्ट्री होताच टीकांचा भडिमार! अंजली दमानिया, मनोज जरांगे म्हणाले … )

क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानला घेरण्यासाठी बीसीसीआयचा (BCCI) हा डाव असल्याची चर्चा मीडियामध्ये रंगली होती. कारण, आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष पाकिस्तानचे मोहसिन नकवी (Mohsin Naqvi) आहेत. सध्या नकवीच पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष आहेत. आणि आशिया स्तरावरही भारतच सर्वाधिक गर्दी खेचणारा देश असल्यामुळे पाकिस्तानला धक्का देण्यासाठी बीसीसीआय ही खेळी खेळेल अशी चर्चा होती. महिलांची इमर्जिंग आशिया चषक ही स्पर्धा जून महिन्यात होणार आहे. तर पुरुषांचा आशिया चषक सप्टेंबरमध्ये आहे. पुरुषांची स्पर्धा भारतात होणार आहे. (Indo – Pak Cricket)

पण, सैकिया यांनी म्हटल्याप्रमाणे हा प्रश्न ऑगस्ट महिन्यात किंवा त्यानंतर बीसीसीआयसमोर येईल. कारण, बदलत्या परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांचा दौरा करतील अशी शक्यता कमीच आहे. शिवाय भारत आणि पाक क्रिकेट सामने खेळायला तयार होतील, अशीही शक्यता नाही. भारताने अजूनही ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) थांबलं नसून पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद्यांना आपल्या देशात थारा देणं थांबवत नाही, तोपर्यंत जागतिक स्तरावर लढा सुरूच राहील अशी भूमिका घेतली आहे. तर पाकिस्तानने आरोप फेटाळले आहेत. (Indo – Pak Cricket)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.