India’s Tour of South Africa : भारताविरुद्धच्या टी-२० व एकदिवसीय  मालिकेसाठी टेंबा बवुमाला विश्रांती, मार्करम करणार नेतृत्व 

दक्षिण आफ्रिकेनंही भारताविरुद्धच्या मालिकेत नवीन खेळाडूंना संदी देण्याचं धोरण ठेवलेलं दिसतंय. टी-२० तसंच एकदिवसीय मालिकेसाठी बवुमाला विश्रांती देण्यात आलीय

190
India’s Tour of South Africa : भारताविरुद्धच्या टी-२० व एकदिवसीय  मालिकेसाठी टेंबा बवुमाला विश्रांती, मार्करम करणार नेतृत्व 
India’s Tour of South Africa : भारताविरुद्धच्या टी-२० व एकदिवसीय  मालिकेसाठी टेंबा बवुमाला विश्रांती, मार्करम करणार नेतृत्व 

ऋजुता लुकतुके

दीड महिने भारतातल्या उकाड्यात पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषक (India’s Tour of South Africa) स्पर्धेनंतर दक्षिण आफ्रिकन संघानेही भारताविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत खेलाडूंना क्रमा क्रमाने विश्रांती देण्याचंच धोरण ठेवलं आहे. विश्वचषका दरम्यान कर्णधार बवुमाने शंभर टक्के तंदुरुस्त नसल्याची तक्रार केली होती. त्यामुळे सुरुवातीच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत बवुमाला विश्रांती देण्यात आली आहे. पण, २६ डिसेंबरपासून होणाऱ्या कसोटी मालिकेत बवुमा खेळणार आहे.

बवुमाच्या अनुपस्थितीत एडन मार्करम संघाचं नेतृत्व करणार आहे. मार्करमसाठी (India’s Tour of South Africa) ही कर्णधारपदाची कसोटी असेल. कारण, व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये त्याचीच नवीन कर्णधार म्हणून चर्चा सुरू होती. आणि ही जबाबदारी पुढे कधीही त्याला कायमस्वरुपी दिली जाऊ शकते. दक्षिण आफ्रिकेचे तीनही मालिकांसाठीचे संघ तुम्ही इथं पाहू शकता.

(हेही वाचा-Thane-Belapur Route: ठाणे-बेलापूर मार्गावर अवजड वाहनांना बंदी; कोणते आहेत पर्यायी मार्ग? जाणून घ्या…)

भारतातील विश्वचषकात (India’s Tour of South Africa) बवुमा सलामीवीर म्हणून चाचपडत होता. केवळ १८ धावांच्या सरासरीने त्याने ८ सामन्यांत दोनशेपेक्षा कमी धावा केल्या. आणि त्याची वैयक्तिक सर्वोच्च खेळी होती ३५ धावांची. एरवी क्विंटन डी कॉक हा आफ्रिकन संघाचा कर्णधारपदाचा उमेदवार असला असता. पण, विश्वचषक स्पर्धेनंतर त्याने निवृत्ती पत्करली आहे. त्यामुळे मार्करमला बढती मिळाली आहे.

मुख्य गोलंदाज रबाडाला कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. कोएट्झी, जानसेन आणि एनगिडीलाही एकदिवसीय मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.