India’s Tour of England : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ कधी निवडणार?

India’s Tour of England : सचिव देवजीत सैकिया यांनी यावर मोठा अपडेट दिला आहे.

36
India’s Tour of England : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ कधी निवडणार?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलनंतर जून महिन्यात होणाऱ्या इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड येत्या दोन आठवड्यात होणार आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनीच तसे संकेत माध्यमांशी बोलताना दिले आहेत. २० जूनला भारताचा कसोटी दौरा सुरू होण्यापूर्वी भारताचा ए संघही इंग्लंडचा दौरा करणार आहे. त्यासाठी संभाव्य खेळाडूंची निवड आणि दौऱ्याचा कार्यक्रम याची तयारी बीसीसीआयने आधीच सुरू केली आहे. (India’s Tour of England)

ए संघाच्या कामगिरीवर बीसीसीआय आणि निवड समितीची लक्ष असणार आहे. हा संघ २५ मे ला भारतातून निघेल अशी शक्यता आहे. या संघातूनच मुख्य दौऱ्यासाठी काही खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. भारतीय संघ जूनच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंडमध्ये असावा असा बीसीसीआयचा विचार आहे. त्या दृष्टीने जे खेळाडू संघाचा भाग असतील आणि आयपीएलमधून लवकर मोकळे होतील, त्यांना लगेचच इंग्लंडला पाठवण्यात येणार आहे. प्रत्यक्ष कसोटी मालिकेपूर्वी भारतीय अ आणि राष्ट्रीय संघ यांच्यात एक चार दिवसीय सामना आयोजित करण्यात येणार आहे. अर्थात, हा सराव सामना असेल. त्यापूर्वी जास्तीत जास्त खेळाडूंनी इंग्लंडला असावं असा प्रयत्न असेल. (India’s Tour of England)

(हेही वाचा – India Pakistan War : भारताची ५ लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला !)

आणि त्या दृष्टीने भारतीय ए संघ तसंच मुख्य संघ हा येत्या पंधरा दिवसांत निवडला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाप्रमाणे इथंही खेळाडू एकत्रपणे इंग्लंडला न जाता तुकड्या तुकड्यांनी जातील अशी शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे या दौऱ्यावर रोहित शर्मा संघाबरोबर असणार नाहीए. त्याने बुधवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे संघाचा नवीन कर्णधार निवडण्याची जबाबदारीही निवड समितीवर असणार आहे. (India’s Tour of England)

अर्थात, अलीकडेच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यात काही विषयांवर चर्चा झाली होती. त्यात हा कप्तानीचा विषयही चर्चिला गेला असण्याचीच शक्यता आहे. निवड समिती नवीन नेतृत्व म्हणून शुभमन गिल किंवा इतर युवा खेळाडूचा विचार करते की, जसप्रीत बुमराहवर सध्या ही जबाबदारी टाकली जाते? की विराट कोहलीला तात्पुरती ही जबाबदारी सोपवण्यीच विनंती केली जाते. अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता काही दिवसांत मिळणार आहेत. (India’s Tour of England)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.