-
ऋजुता लुकतुके
आयपीएल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि त्याचवेळी सगळ्यांना वेध लागले आहेत ते भारताच्या बहुचर्चित इंग्लंड दौऱ्याचे (India Tour of England). विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजांची या मालिकेत कसोटी लागणार आहे. भिस्त आहे ती अनुभवी के. एल. राहुल आणि पुन्हा फॉर्म गवसलेल्या करुण नायरवर. करुण नायर सध्या भारतीय ए संघाकडून इंग्लंडमध्येच खेळतोय. तर के. एल. राहुलनेही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (India Tour of England)
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : राज्य सरकारचा मोठा निर्णय; मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरित)
आयपीएलमध्ये त्याचा संघ दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान संपुष्टात आल्यावर त्याने सरावासाठी इंग्लंडला (India Tour of England) जाण्याचा निर्णय घेतला आहे. तो सोमवारीच रवाना होणार आहे. त्यामुळे इंग्लंड लायन्स संघाविरुद्धचा दुसरा अनधिकृत सामना तो खेळू शकेल. या सामन्यासाठी उपलब्ध असल्याचं त्याने निवड समितीला कळवलं आहे. इंडियन एक्सप्रेसने बीसीसीआयच्या एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, ‘तो सोमवारी इंग्लंडला जाणार आहे आणि इंडिया अ संघासोबत दुसरा सराव सामना खेळेल. तो मालिकेत पाच कसोटी सामने खेळणाऱ्या वरिष्ठ पुरुष संघाचा भाग असल्याने, या सामन्यांमुळे त्याला सराव करण्याची संधी मिळेल.’ (India Tour of England)
(हेही वाचा – महाराष्ट्र BJP मध्ये संघटनात्मक घडामोडींना वेग; प्रदेशाध्यक्ष जवळपास ठरला, पण ‘मुंबई कप्तान’ अजूनही अनिश्चित)
त्यानंतर पूर्ण भारतीय संघ १३ जून रोजी बेकेनहॅम इथं एक सराव सामना खेळणार आहे. राहुल नोव्हेंबर-जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियात भारतीय कसोटी संघाचा भाग होता. त्याने ऑस्ट्रेलियात पाच कसोटी सामन्यांमध्ये ३०.६६ च्या सरासरीने २५५ धावा केल्या, ज्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश होता. त्याने पर्थ कसोटीत ७७ धावांची खेळी खेळली. राहुलने आतापर्यंत भारतासाठी ५८ कसोटी सामने खेळले आहेत. ३३.५७ च्या सरासरीने ३,२५७ धावा केल्या आहेत. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या १९९ आहे. या दरम्यान, त्याने आठ शतके आणि १७ अर्धशतके झळकावली आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली निवृत्त झाल्यानंतर तो इंग्लंडमध्ये (India Tour of England) भारतीय संघाच्या वरिष्ठ फलंदाजांपैकी एक असेल. (India Tour of England)
(हेही वाचा – India A vs England Lions : करुण नायरची द्विशतकाकडे वाटचाल; चौथ्या स्थानासाठी जोरदार दावेदारी)
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक :
पहिली कसोटी – २०-२४ जून – हेडिंग्ले, लीड्स
दुसरी कसोटी – २-६ जुलै – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी – १०-१४ जुलै – लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी – २३-२७ जुलै – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी – ३१ जुलै-४ ऑगस्ट – द ओव्हल, लंडन (India Tour of England)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community