आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे यंदा संघाच्या कर्णधार पदाची धुरा शुभमन गिलकडे (Captain Shubman Gill), तर ऋषभ पंत हा उपकर्णधार (Vice-captain Rishabh Pant) असेल. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत ही नावे जाहीर केली. (Shubman Gill)
(हेही वाचा – पंतप्रधानांनी म्हटलं, भारतीय सुरक्षेची ‘नवीन रणनीती’; सैन्यदलांच्या रणरागिणींची Operation Sindoor मध्ये अचूक कारवाई)
काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर या दोघांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला खेळावे लागणार आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला कसोटी क्रिकेट संघात तरुण नेतृत्व आणि नव्या दमाचे खेळाडू हवे होते. त्यामुळे गौतम गंभीर हा रोहित शर्मा आणि विराट कोहलीला भारतीय संघात खेळवण्यासाठी उत्सुक नव्हता. विराट कोहलीला संघात स्थान मिळाले असते तरी त्याच्याकडे कर्णधारपद नसते. यामुळेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
Say Hello to #TeamIndia‘s newest Test Captain 👋@ShubmanGill pic.twitter.com/OkBmNZT5M0
— BCCI (@BCCI) May 24, 2025
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ – शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, करुण नायर, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, कुलदीप यादव, के एल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, नितीश कुमार रेड्डी यांचा समावेश आहे. तर भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला आगामी मालिकेतून वगळण्यात आले आहे. स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला देखील संधी मिळाली नाही. याशिवाय ज्या नावांची घोषणा झालेली नाही त्यांच्याबद्दल बरीच चर्चा सुरू झाली. यापैकी एक नाव म्हणजे सरफराज खान. या दौऱ्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती आणि त्याची फिटनेसही दाखवली होती.
(हेही वाचा – Bangladesh Violence : शेख हसीना असो किंवा आता लष्कर विरोधात आंदोलन, बांगलादेशात हिंदूंचाच बळी !)
भारतीय संघाचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक
सराव सामना – १३ जून – बेकेनहॅम
पहिली कसोटी – २० जून – लीड्समधील हेडिंग्ले मैदान
दुसरी कसोटी – २ जुलै – बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदान
तिसरी कसोटी – १० जुलै – लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियम
चौथी कसोटी – २३ जुलै मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदान
पाचवी कसोटी – ३१ जुलै – द ओव्हल मैदान
ही पाच सामन्यांची कसोटी मालिका भारतीय संघाच्या नव्या नेतृत्वाखाली खेळली जाणार असून, क्रिकेट चाहत्यांसाठी ही एक महत्त्वाची आणि रोमांचक मालिका ठरेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community