INDIA VS SOUTH AFRICA T-20 WORLD CUP : भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे आव्हान

81

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेचा (INDIA VS SOUTH AFRICA T-20 WORLD CU) अंतिम सामना आज बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल ब्रिजटाउन मैदानावर होत आहे. हा सामना एकही सामना न गमावलेल्या दोन तगड्या संघांमध्ये म्हणजेच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. शनिवारी, २९ जून रोजी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलदांजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवात उत्तम करणारा भारतीय संघ तिसऱ्या षटकानंतर रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार या तिघांना गमावून बसला त्यामुळे भारताचा डाव रडखळला. मात्र नंतर अक्षर पटेल आणि विराट कोहलीच्या जोडीने भारताला १०० पर्यंत आणून ठेवले. भारताच्या संघाने २० षटकांत १७६ धावा करून भारतीय संघासमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले.

(हेही वाचा Shri Shivrajyabhishek Sohala ला शासकीय मान्यता; श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीला यश )

विराट अन् अक्षरची ५४ चेंडूंत ७२ धावांची भागीदारी दुर्दैवीरित्या संपुष्टात आली. क्विंटन डी कॉकच्या थ्रोवर अक्षर ( ४७ धावा, ३१ चेंडू, १ चौकार व ४ षटकार) रन आऊट झाला. विराट कोहलीने शेवटच्या सामन्यात जलवा दाखवला.
विराट कोहली याआधीच्या सामन्यांत फारशी चांगली कामगिरी करू शकला नसला तरी या सामन्यात मात्र तो आपली चुणूक दाखवली. ४९ चेंडूत ५० धावा केल्या, मात्र त्यानंतर षटकार, चौकार मारत विराटने ५९ चेंडूत ७७ धावा केल्या. त्यानंतर तो झेल बाद झाला. त्यानंतर शिवम दुबे, हार्दिक पंड्या यांनी धावसंख्या धावती ठेवणे दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे आव्हान उभे केले. (INDIA VS SOUTH AFRICA T-20 WORLD CU)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.