India Vs Malaysia Football : मेरदेका चषकात मलेशियाकडून भारत ४-२ ने पराभूत

मेरदेका चषकातील भारतीय संघाची वाटचाल अगदीच अल्पजीवी ठरली.

65
India Vs Malaysia Football : मेरदेका चषकात मलेशियाकडून भारत ४-२ ने पराभूत
India Vs Malaysia Football : मेरदेका चषकात मलेशियाकडून भारत ४-२ ने पराभूत
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाला मलेशिया विरुद्ध २-४ असा पराभव पत्करावा लागला आणि या पराभवाबरोबरच मेरडेका चषकातील भारतीय आव्हानही संपुष्टात आलंय. मेरदेका चषकातील भारतीय संघाची वाटचाल अगदीच अल्पजीवी ठरली. पहिल्याच सामन्यात भारताला मलेशियाकडून २-४ असा पराभव पत्करावा लागला आणि तिथेच भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आलंय. (India Vs Malaysia Football)

कौलालंपूर इथं झालेल्या या सामन्यात पहिला अर्धा तास दोन्ही संघ समसमान होते. मलेशियाने सातव्या मिनिटाला डियन कूल्सच्या गोलमुळे आघाडी घेतली असली तरी भारतालाही महेश सिंगने तेराव्याच मिनिटाला बरोबरी साधून दिली. महेशचा हा व्हॉली मारिन केलेला गोल सुरेख होता. पुढेही दोन्ही संघांनी आक्रमक बाणा कायम ठेवला होता. (India Vs Malaysia Football)

पण, त्यानंतर निखिल पुजारीच्या एका फालतू चुकीमुळे पंचांनी मलेशियाला पेनल्टी कीक बहाल केली आणि इथं अरिफ अमिनने मलेशियासाठी दुसरा गोल केला. त्यानंतर आणखी काही मिनिटांनी फैसल हलिमने आघाडी ३-१ अशी वाढवली. पहिल्या हाफमध्ये मलेशियाच आघाडीवर होती. (India Vs Malaysia Football)

(हेही वाचा – Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण द्या अन्यथा … ; मनोज पाटील यांचा सरकारला इशारा)

त्यानंतर भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने काही चांगल्या चाली रचत थोडीफार हलचल निर्माण केली. ५२व्या मिनिटाला एक गोल करत त्याने मलेशियाची आघाडी कमी करण्याचाही प्रयत्न केला. भारतीय आघाडीची फळी चांगला खेळ करत असतानाच सामन्यातील एक मोठा वादग्रस्त प्रसंग उद्भवला. लालियनझुलाने केलेला गोल पंचांनी बाद ठरवला. भारतासाठी खरंतर ही बरोबरीची चांगली संधी होती. पण, भारतीयांचं अपीलही फेटाळून लावण्यात आलं. भारतीय प्रशिक्षक इगॉर स्टायमॅक या निर्णयामुळे भलतेच नाराज झाले होते. कारण, रिप्लेमध्ये बॉल गोलरेषेच्या पुढे गेलेला स्पष्ट दिसत होता. (India Vs Malaysia Football)

भारतीय संघाची लयच त्यानंतर बिघडली आणि त्याचा फायदा घेऊन मलेशियाच्या कॉर्बिन आँगने ६१व्या मिनिटाला आणखी एक गोल करत भारतीय जखमेवर मीठ चोळलं. सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टीही आंतरराष्ट्रीय सामन्याला साजेशी नव्हती. आणि मैदानावर जागोजागी खड्डे होते. मेरदेका चषक हा मिनि आशिया चषक म्हणून ओळखला जातो. या स्पर्धेत भारत, मलेशिया आणि तझाकिस्तान हे तीनच संघ खेळत आहेत. आता अंतिम सामना १७ ऑक्टोबरला तझाकिस्तान आणि मलेशिया दरम्यान होईल. (India Vs Malaysia Football)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.