India Tour of England : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय खेळाडूही मध्यातच आयपीएल सोडणार?

India Tour of England : भारत ए संघात निवड झाली तर खेळाडूंना बाद फेरी आधी आयपीएल सोडावी लागेल.

41
India Tour of England : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय खेळाडूही मध्यातच आयपीएल सोडणार?
  • ऋजुता लुकतुके

अलीकडच्या काळात रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांच्या निवृत्तीमुळे भारतीय संघासमोरची आव्हानं वाढत असल्याचे दिसून येत आहे. भारत-इंग्लंड मालिका सुरू होण्यापूर्वी भारत-अ संघाचा इंग्लंड दौरा ३० मे पासून सुरू होणार आहे. पण, त्या दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील सीमा तणाव वाढल्यामुळे आयपीएल स्पर्धा एका आठवड्याने पुढे गेली आहे. परिणामी, ए संघाची पहिली कसोटी आणि आयपीएलची बाद फेरी एकाच वेळी येत आहे. अशावेळी भारतीय खेळाडूच आयपीएल मध्यावर सोडतील अशी चिन्हं आहेत. (India Tour of England)

आयपीएल २०२५ आता १७ मे पासून सुरू होत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ३ जून रोजी होईल. ज्यामुळे थेट भारत-अ संघ आणि इंग्लंडच्या वेळापत्रकावरही परिणाम होऊ शकतो. आता एका मीडिया रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की इंडिया-अ संघात यशस्वी जयस्वाल आणि ईशान किशन ही दोन मोठी नावे समाविष्ट केली जाऊ शकतात. (India Tour of England)

(हेही वाचा – ‘Operation Sindoor’ अजून संपलेले नाही ‘हा’ फक्त एक ट्रेलर होता, पूर्ण चित्रपट अजून बाकी आहे; राजनाथ सिंह यांचा पाकला इशारा)

द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, इंग्लंड लायन्सविरुद्धच्या सामन्यात इशान किशन आणि यशस्वी जयस्वाल या रूपात दोन मोठी नावे इंडिया-अ संघाकडून खेळू शकतात. त्याच अहवालात असेही सांगण्यात आले होते की, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती इंडिया-अ च्या पहिल्या सामन्यासाठी १४ सदस्यीय संघ निवडू शकते. या संघात निवड झालेले खेळाडू आयपीएलच्या बाद फेरीत खेळू शकणार नाहीत हे उघड आहे. (India Tour of England)

यशस्वी जयस्वाल आणि ईशान किशन यांच्याशिवाय करुण नायर, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, खलील अहमद, आकाशदीप, मानव सुथार आणि अंशुल कंबोज यांना भारत-अ संघात स्थान मिळू शकते. त्याच वेळी, आयपीएल २०२५ मध्ये खेळत नसलेला सरफराज खान देखील या संघाचा भाग असू शकतो. दरम्यान, बोटाच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार इंग्लंड दौऱ्यासाठी तंदुरुस्त नसण्याची शक्यता आहे. (India Tour of England)

(हेही वाचा – ICC Helps Pakistan : आयसीसीकडून भारताला मिळाले १२ कोटी रुपये; पाकला किती पैसे मिळणार?)

इतकंच नाही तर शुभमन गिल, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर हे इंडिया-अ च्या दुसऱ्या सामन्यात खेळताना दिसू शकतात. इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्यापूर्वी भारतीय अ आणि भारतीय राष्ट्रीय संघादरम्यान एक सामना इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. रोहित, विराटच्या निवृत्तीनंतर भारतीय ए संघाच्या कामगिरीवर निवड समितीचं बारकाईने लक्ष असेल. (India Tour of England)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.