India Tour of England : इंग्लंड दौऱ्यातील सराव सामन्यात कुणाची कामगिरी वरचढ?

India Tour of England : गिल आणि राहुल यांनी फलंदाजीचा चांगला सराव केला. 

51
India Tour of England : इंग्लंड दौऱ्यातील सराव सामन्यात कुणाची कामगिरी वरचढ?
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीची तयारी म्हणून भारताने इंग्लंडमध्येच भारतीय संघ विरुद्ध भारतीय ए संघ असा एक सराव सामना आयोजित केला होता. या सामन्यात पहिल्या दिवशी के. एल. राहुल आणि शुभमन गिल यांनी अर्शतकं झळकावली आहेत. त्यामुळे फलंदाजीचा सराव या दोघांनी चांगला साधला. तर शार्दूल ठाकूरने गोलंदाजीत लय दाखवून दिल्याचं समजतंय. या सामन्याचं प्रसारण कुठेही झालेलं नाही. किंवा वार्तांकनही झालेलं नाही. पण, बीसीसीआयने ट्विट्सच्या माध्यमातून कामगिरीची झलक दाखवली आहे. (India Tour of England)

शुभमन गिल सरावादरम्यानही गंभीर दिसत होता आणि तोच फॉर्म त्याने या सामन्यातही दाखवून दिला. सध्या तो तिसऱ्या क्रमांकावर खेळत आहे. त्याने काही मजबूत फटके खेळलेले दिसले. तर के. एल. राहुलने भारतीय ए संघाकडून खेळताना ११६ आणि ५१ धावा केल्या होत्या. तोच फॉर्म या सामन्यातही त्याने दाखवून दिला. त्यामुळे सलामीला यशस्वी जयस्वाल आणि के. एल. राहुल खेळणार हे आता जवळ जवळ स्पष्ट आहे. (India Tour of England)

(हेही वाचा – ड्रग्ज तस्कर ताहिर डोला CBI च्या ताब्यात; यूएईतून केले होते हद्दपार)

दुसरीकडे, बेकेंघम इथं झालेल्या या सराव सामन्यात शार्दूल ठाकूरने गोलंदाजीत सर्वाधिक बळी घेतले. एकूणच तो लयीत गोलंदाजी करताना दिसत होता. अंतिम अकरामध्ये स्थान मिळवण्यासाठी शार्दूलची स्पर्धा नितिश रेड्डीशी आहे. खेळपट्टीकडून त्याला मदत मिळत होती. त्याचा फायदा उचलत शार्दूलने चेंडू चांगले स्विंग केले आणि बळीही मिळवले. त्यापूर्वी या सामन्यात भारतीय खेळाडू काळ्या फिती लावून उतरले होते. एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात २६५ च्या वर लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय खेळाडूंना मैदानातच दोन मिनिटांचं मौनही बाळगलं. (India Tour of England)

(हेही वाचा – WTC Final : दक्षिण आफ्रिका ऐतिहासिक कसोटी अजिंक्यपदाच्या जवळ; विजयासाठी हव्या ६९ धावा)

या सामन्यानंतर भारतीय संघ हेडिंग्लेला रवाना होईल. तिथे २० तारखेपासून भारतीय संघाचा पहिला कसोटी सामना लीड्सला होणार आहे. पुढील कसोटी बर्मिंगहॅम, लॉर्ड्स, मँचेस्टर आणि ओव्हल इथं होणार आहेत. (India Tour of England)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.