India Tour of England : भारताची कप्तानी जाहीर झाल्यावर शुभमन गिलने आधी काय केलं?

भारताचं नेतृत्व करू असा विचारही शुभमनने केला नव्हता.

40
India Tour of England : भारताची कप्तानी जाहीर झाल्यावर शुभमन गिलने आधी काय केलं?
India Tour of England : भारताची कप्तानी जाहीर झाल्यावर शुभमन गिलने आधी काय केलं?
  • ऋजुता लुकतुके

भारतासाठी शुभमन गिल (Shubman Gill) हा युवा क्रिकेटपटू सध्या झाकली मूठ आहे. फलंदाजीत आतापर्यंत त्याने चमक दाखवली आहे. पण, आता त्याच्यावर विराट आणि रोहितच्या अनुपस्थितीत आणखी मोठी जबाबदारी आहे. तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर डावाला आकार देण्याची. आणि संघाचं नेतृत्व करण्याची. पैकी नेतृत्वपदी त्याची निवड झाली तेव्हा त्याच्या भावना काय होत्या हे नुकतंच त्याने स्काय स्पोर्ट्शी बोलताना सांगितलं आहे. माजी भारतीय कसोटीपटू दिनेश कार्तिकशी (Dinesh Karthik) बोलताना शुभमन म्हणतो, ‘अशा संधीचा कधी विचारच केला नव्हता.’ (India Tour of England)

‘मला सोडा, माझ्या वडिलांनाही कधी असं वाटलं नव्हतं. मला तर स्वप्नातही कधी मी नेतृत्व करताना दिसलं नाही. माझ्या नावाची अधिकृत घोषणा होईपर्यंत मी त्यांना सांगितलंही नव्हतं. पण, त्यांना कळल्यावर त्यांचाच मला फोन आला,’ असं पुढे शुभमन म्हणतो. भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा शुभमन आयपीएलमध्ये (IPL) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचं नेतृत्व करत होता. वडील फोनवर खुश होते, असं तो म्हणतो. ‘माझ्या क्रिकेटला वडिलांनीच खतपाणी घातलं आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं जरुरी होतं. त्यांनी झालेला आनंद मला सांगितला. आणि कप्तान म्हणून आवश्यक ती जबाबदारी घे. चांगलं काम कर, इतकंच सांगितलं,’ असं शुभमन (Shubman Gill) म्हणाला.

(हेही वाचा – Hospital : रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाचे हक्क कोणते आहेत?)

२०२० मध्ये मेलबर्न (Melbourne) इथं शुभमन भारतासाठी पहिली कसोटी खेळला. तेव्हापासून ३२ कसोटींत त्याने १,८९३ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ५ शतकं आहेत. आता विराट आणि त्यानंतर रोहितने बजावलेली भूमिका त्याला वठवायची आहे. तो भारताचा ३७ वा कसोटी कर्णधार असणार आहे. आणि पहिलंच आव्हान त्याच्यासमोर आहे ते इंग्लंडच्या (England) आव्हानात्मक वातावरणात भारतीय संघाचं नेतृत्व करण्याचं. (India Tour of England)

भारत आणि इंग्लंड दरम्यानची कसोटी मालिका २० जूनपासून सुरू होत आहे. पहिली कसोटी लीड्स इथं आहे. त्यानंतर एजबॅस्टन, लॉर्ड्स, ओल्ड ट्रॅफर्ड आणि ओव्हल इथं पुढील कसोटी होणार आहेत. ५ कसोटींच्या या मालिकेनं आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं (ICC Test Championship) नवीन चक्रही सुरू होणार आहे. (India Tour of England)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.